लाडक्या गणरायाची मागील 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज निरोप दिला जाणार आहे. देशभरातील गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक हे भाविकांचं खास आकर्षण असतं. देशभरातून लोक पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. जवळपास 6500 पोलीस आज रस्त्यावर उतरणार आहे.
पुण्यातील होणारी गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनी पुण्यातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. तर काही रस्त्यांचे मार्ग बदलून पर्यायी मार्ग खुले केले आहे. पुण्यातील वाहतूक आज कशी असेल यावर एक नजर टाकूया.
(नक्की वाचा - Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत गणेश विसर्जनाची महातयारी, मंगळवारी कोणते मार्ग बंद राहणार?)
पुण्यातील वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते
- लक्ष्मी रस्ता
- छत्रपती शिवाजी रस्ता
- टिळक रस्ता
- शास्त्री रस्ता
- केळकर रस्ता
- बाजीराव रस्ता
- कुमठेकर रस्ता गणेश रस्ता
- जंगली महाराज रस्ता
- कर्वे रस्ता
- फर्ग्युसन रस्ता
- भांडारकर रस्ता
- पुणे-सातारा रस्ता
- सोलापूर रस्ता
- प्रभात रस्ता
- बगाडे रस्ता गुरू नानक
(नक्की वाचा - Lalbagh Raja : एक पाय गरीबाचा, एक पाय श्रीमंताचा; लालबागच्या चरणी भेदभाव; संतापजनक Video)
पुण्यात पार्किंगची व्यवस्था कुठे?
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठे (दुचाकी आणि चारचाकी), एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी अन् चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी अन् चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी अन् चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), फर्ग्युसून कॉलेज (दुचाकी अन् चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), नदीपात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी अन् चारचाकी).