जाहिरात

Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत गणेश विसर्जनाची महातयारी, आज कोणते मार्ग बंद राहणार?

गणपती विसर्जनादरम्यान भाविकांना बाप्पाचं शेवटचं दर्शन घेता यावं आणि मिरवणुकीत सहभागी होता यावं यासाठी मुंबई पोलीस तयारीत आहेत.

Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत गणेश विसर्जनाची महातयारी, आज कोणते मार्ग बंद राहणार?
मुंबई:

गणपती विसर्जनादरम्यान भाविकांना बाप्पाचं शेवटचं (Mumbai Ganesh Visarjan) दर्शन घेता यावं आणि मिरवणुकीत सहभागी होता यावं यासाठी मुंबई पोलीस तयारीत आहेत. मुंबईत 204 कृत्रिम तलावांसह भाविक BMC ने दिलेलं QR कोड स्कॅन करून आपल्या जवळील विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. याशिवाय बीएमसीने शहरभरात 12,000 हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी 10 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने प्रत्येक घडामोडीवर नजर असेल. 

बीएमसीने मुंबईत 204 कृत्रिम तलाव आणि 69 नैसर्गिक  स्थळांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी बीएमसीने 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. 

गणपती विसर्जनादरम्यान वाहतुकीच्या मार्गात बदल...

  • मरीन ड्राइव्ह - NS रोडच्या उत्तरेचा ट्रॅफिक आवश्यकता भासल्यास इस्लाम जिमखानाहून मुंबई कोस्टल रोडकडे वळविण्यात येईल. 
  • महापालिका मार्ग - CSMT जंक्शन ते मेट्रो जंक्शनपर्यंत रस्ता गरज भासल्यास बंद ठेवण्यात येऊ शकतो. येथील वाहतूक CSMT जंक्शनहून डीएन रोडवर वळविण्यात येईल. 
  • JSS रोड - अल्फ्रेड जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंतचा रस्ता बंद ठेवण्यात येऊ शकतो. येथील वाहतूक काळबादेवीहून वळविण्यात येईल. 
  • जुहू तारा रोड - सांताक्रूज पोलीस स्टेशन जंक्शन ते वी हॉटेल जंक्शनपर्यंतचा रस्ता बंद राहील. 
  • गोखले ब्रिज रोड - जड वाहनांना बंदी राहील. 
  • मार्वे रोड जंक्शन, मालाड - मार्वे रोड ते मिथ चौकीपर्यंतचा रस्ता बंद राहील. 
  • नाथलाल पारेख मार्ग: भाई बंदरकर मार्ग ते इंदु क्लिनिकपर्यंत दोन्ही मार्ग बंद
  • पर्यायी मार्ग : कॉ.प्रकाश पेठे मार्ग ते पांडे लेन जंक्शनपर्यंत.संत गाडगे महाराज ते पांडे लेन चौक उत्तर वाहिनीपर्यंत 
  • मरीन ड्राइववर नेताजी सुभाष चंद्र मार्ग, एअर इंडिया जंक्शन ते मफतलाल जंक्शनपर्यंत दोन्ही बाजुला नो पार्किंग
  • आझाद मैदान डिव्हिजन- सीएसएमटी जंक्शन ते डी.एन. पर्यंत. एल.टी.मार्ग वळवला
  • अल्फ्रेड जंक्शन ते पोर्तुगाल चर्चपर्यंत वाहतूक बंद राहील
  • कस्तूरबा गांधी चौक ते नित्यानंद हॉटेल जंक्शनपर्यंत मार्ग बंद राहील
  •  वाहतूक पर्यायी मार्गाने कालबादेवी रोड आणि महर्षि कर्वे रोडने वळवली
  • बंद- घोड़ागाड़ी जंक्शन ते खट्टर गल्ली, चर्नी रोड स्टेशन ते प्रार्थना समाज जंक्शन, 
  • गुलाल वाडी स्पायरल ते सीपी टँक 
  • बँडस्टैंड ते मफतलाल दोन्ही मार्ग बंद राहतील. नवजीवन स्पायरल ते एम पॉवेल रोडवर वाहतूक बंद 
  • तीन बत्ती जंक्शन ते बँडस्टँडपर्यंत एकतर्फी वाहतूक सुरू राहील. 
  • नो पार्किंग- केनेडी ब्रीज, ओपेरा हाउस जंक्शन, मराठे बंधू चौक ते नवजीवन जंक्शन  
  • नो पार्किंग- प्रार्थना समाज बाटा जंक्शन ते प्रार्थना समाज रोड 
  •  
  • बंद- गुलाबराव गणाचार्य चौक ते खटाव मिल,  सातरस्ता जंक्शन ते खाडा पारशी जंक्शन
  • बंद- खडा पारशी जंक्शन ते नागपाड़ा जंक्शन,  नागपाडा जंक्शन ते मुंबई सेंट्रल जंक्शन 
  • बंद- शुक्लाजी स्ट्रीट ते टू टँक जंक्शनपर्यंत 
  • बंद-  बावला कंपाउंड ते भारत माता जंक्शन पर्यंत नॉर्थ चॅनल वाहतूक 
  • बंद- चिंचपोकळी जंक्शन ते संत जगनाडे महाराज चौकापर्यंत 
  • बंद- भोईवाड़ा नाका से हिंदमाता जंक्शनपर्यंत वाहतूक 
  •  वन वे- नायगाव क्रॉस ते सरफेयर चौक, परेल जंक्शन ते खानोलकर मार्ग

Lalbagh Raja : एक पाय गरीबाचा, एक पाय श्रीमंताचा; लालबागच्या चरणी भेदभाव; संतापजनक Video

नक्की वाचा - Lalbagh Raja : एक पाय गरीबाचा, एक पाय श्रीमंताचा; लालबागच्या चरणी भेदभाव; संतापजनक Video

गणपती विसर्जनासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. गणेश उत्सवादरम्यान उत्तर मुंबईहून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारा कोस्टल रोड 18 सप्टेबरपर्यंत सुरू राहील. विसर्जनादरम्यान इस्टन फ्री वे/ अटल सेतू, काळबादेवी रोड, महात्मा फुले रोड, कफ परेड आणि बधवार पार्कमध्ये वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान नागरिकांनी या भागातून प्रवास करणे टाळावं अशी नियमावली जारी करण्यात आली आहे. याशिवाय इस्टर्न मार्गावर साकीनाका, मुलुंड, मानखुर्द आणि ट्रॉम्बे या भागात विसर्जनादरम्यान गर्दीची शक्यता आहे. चेंबूर, चुनाभट्टी आणि एमआयडीसी भागात मोठी गर्दी होऊ शकते. याशिवाय पश्चिम भागात सांताक्रूझ वाकोला ब्रिज, जुहू बीच, डीएन नगर, सहारा, कांदिवली गोरेगाव आणि बोरीवली भागात विसर्जनादरम्यान मोठी गर्दी होऊ शकते. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
Mumbai Ganesh Visarjan : मुंबईत गणेश विसर्जनाची महातयारी, आज कोणते मार्ग बंद राहणार?
Pune Ganpati Visarjan Which roads will be closed and parking arrangements
Next Article
Pune Ganpati Visarjan : पुण्यात आज कोणते रस्ते बंद असतील? पार्किंगची व्यवस्था कुठे असेल?