
रेवती हिंगवे
विद्येचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे. पण गेल्या काही महिन्यातील पुण्यातील घटना पाहाता ही ओळख पुसली जाते की काय अशी भिती निर्माण झाली आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रोज काही नाही काही घटनांनी पुणे हादरून जात आहे. कधी खून, कधी बलात्कार, कधी हुंडाबळी तरी कधी फेक रेप सारख्या घटना समोर आल्या आहेत. त्यावर गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी कुणाचे नियंत्रण आहे की नाही असा ही प्रश्न निर्माण झाला आहे. डिलिव्हरी बॉयने रेप केल्याची घटना ताजी असताना आणखी एक घटना पुण्यात समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात एका 73 वर्षाच्या आजोबांने चक्क एका आपल्या नातीच्या वयाच्या तरुणीचा विनयभंग केला आहे. ही तरुणी एका रुग्णालयात रिसेप्शनिस्टचं काम करते. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील विश्रामबाग रोड परिसरात एक खाजगी दवाखाना आहे. या दवाखान्यात ही तरुणी काम करते. याच ठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आला. सर्वां समोर ही घटना घडल्याने सर्वच जण हादरून गेले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai Crime: संतापजनक! कॉम्प्युटर क्लासेस चालकाकडून महिला सहकाऱ्याचा विनयभंग
ही घटना 3 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. क्लिनिकमध्ये 73 वर्षीय सुरेशचंद चोरडिया नावाचा वृद्ध रुग्ण म्हणून दाखल झाला होता. क्लिनिकमध्ये त्या दिवशी रिसेप्शनवर एकटीच तरुणी उपस्थित होती. ही संधी साधत आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन सुरू केले. त्याने अचानक रिसेप्शनिस्टच्या गालाला हात लावत "पप्पी दे" अशी विकृत मागणी केली. यानंतर खिशाकडे हात दाखवत म्हणाला, "माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो, तुला जे हवे ते मी देतो, पण तू मला पाहिजे ते कर."
या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ क्लिनिक सोडले आणि बाहेर पळ काढला. मात्र आरोपी वृद्धाने तिला पाठलाग करत, "उद्या क्लिनिकमध्ये आहेस का?" असा प्रश्न विचारत तिला पुन्हा मानसिक त्रास दिला.या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक तणावात आलेल्या तरुणीने अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरेशचंद चोरडिया याच्यावर विनयभंग, महिलेला मानसिक त्रास देणे तसेच अश्लील प्रस्ताव देण्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वय कितीही असो, महिलांप्रती असभ्य वर्तन करणाऱ्या कोणालाही कायदा पाठीशी घालणार नाही, हे या प्रकरणावरून स्पष्ट होते. या घटनेनंतर तरुणीने तातडीने विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिने आपल्या सोबत झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी ही घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तातडीने कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वृद्ध व्यक्तीला अटक केली आहे. शिवाय नक्की प्रकार काय आहे याचा तपास पोलिस आता करत आहे. पण या घटनेनं पुन्हा एकदा पुण्याकडे बोट उचलले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world