Pune Metro Video: खिडक्या-दरवाजे बंद; तरीही पुणे मेट्रोत कसं काय साचलं पाणी? धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Pune Metro News: पुणे मेट्रोचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी (22 मे) संध्याकाळी झालेल्या पावसामुळे पिंपरी-स्वारगेट पर्पल लाइनच्या मेट्रोचे छतातून पाणी गळती सुरू झाली आणि प्रवाशांची तारांबळ उडाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pune Metro Video: पुणेकरांसोबत घडलेल्या 'या' प्रकाराने इंटरनेटवर उडाली खळबळ"
Social Media

- सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune Metro Viral Video: कल्पना करा की तुम्ही मेट्रोच्या आत आहात आणि अचानक तुमच्यावर धो-धो पाऊस पडू लागला तर? आधी तर तुम्ही थक्क व्हाल आणि नंतर तुम्हाला रागही येईल. पुणे मेट्रोमधील असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे अनेक प्रवासी नेहमी प्रमाणे मेट्रोने प्रवास करत होते, इतक्यात मेट्रोच्या छताच्या बाजूने अंगावर पाणी पडू लागले. पाहता पाहता काही वेळातच मेट्रोच्या आत पाणी साचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अंगावर पडणाऱ्या या पाण्यापासून लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी इकडेतिकडे पळतानाही दिसले. पुणे मेट्रोचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

(नक्की वाचा : Thane Cloudburst Like Rain: ठाण्यात ऐन कडक उन्हाळ्यात आभाळ फाटलं; मुरबाडमधील 'या' तीन ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस)

पुणे मेट्रोतील धक्कादायक प्रकार VIDEO

(नक्की वाचा: Mumbai Rain Update: मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे, पावसाचा यलो अलर्ट जारी! IMDचा महत्त्वाचा इशारा

व्हायरल झालेला हा व्हिडीओ शुक्रवार (22 मे) संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाच्या वेळेचा असल्याचे म्हटलं जात आहे. या पावसामुळे पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी-स्वारगेट पर्पल लाइनच्या एका पॅसेंजर कोचमध्ये गळती सुरू झाली होती. हा सर्व प्रकार कोणीतरी मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कोचमधील पाणीगळतीपासून प्रवासी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अनेकजण भिजले देखील आहेत. 

Advertisement