Pune News : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याचा कारनामा; चेहऱ्यासाठी तब्बल 9 लाखांचे इंजेक्शन अन् बिल...

पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य सेवेअंतर्गत आरोग्य योजना राबवली जाते. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद महापालिका करते.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News: पुणे महानगरपालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याने चेहऱ्यावर तेज दिसून यावे आणि चेहरा टवटवीत राहावा म्हणून तब्बल 9 लाखांचे इंजेक्शन घेतल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर त्याने ते बिल पुणे महानगरपालिकेकडून घेण्याचा प्रयत्न केला. कारण पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या औषध उपचाराचे खर्च हे महापालिका उचलते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र बोंबाबोंब होऊन बदनामीची होण्याच्या शक्यता निर्माण झाल्याने या खर्चाची बिले मागे घेण्यात आली. आरोग्य विभागाने बिले मंजूर केली नाहीत, पण या प्रकाराची चर्चा मात्र रंगली आहे. 

Advertisement

 (नक्की वाचा-  "तुमच्या प्रॉपर्टी सोडा बायका किती आहेत ते पण काढावं लागेल", शिरसाटांचं दानवेंच्या टीकेला उत्तर)

पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य सेवेअंतर्गत आरोग्य योजना राबवली जाते. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद महापालिका करते. महापालिकेचे अधिकारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना दुर्धर आजारात या योजनेने मोठा आधार दिल्यामुळे या योजनांचे महत्व अधोरेखित झाले आहे.

(नक्की वाचा-  Mumbai BEST Bus Routes: मुंबईत बेस्टने केले विविध बसमार्गांमध्ये बदल; वाचा नवीन वेळापत्रक)

दरम्यान, महापालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याने व कुटुंबीयांनी ‘टुटा थिऑन' नावाचे इंजेक्शन घेतले. या इंजेक्शनची किंमत बाजारात 50 हजारांपासून ते एक लाखापर्यंत आहे. हे इंजेक्शन घेतल्यानंतर चेहरा टवटवीत होतो, त्वचेवर तेज येते.

तसेच या इंजेक्शनमुळे थकवा कमी होत असल्याचेही सांगितले जाते. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना हे इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचे सुमारे नऊ लाख रुपयांचे बिले आरोग्य विभागात सादर केले होते. मात्र आरोग्य विभागाने बिले मंजूर केली नाहीत, मात्र चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Topics mentioned in this article