जाहिरात

Political News: "तुमच्या प्रॉपर्टी सोडा बायका किती आहेत ते पण काढावं लागेल", शिरसाटांचं दानवेंच्या टीकेला उत्तर

Sanjay Shirsat Vs Ambadas Danve: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव यांनी संजय शिरसाट यांना हॉटेल खरेदी व्यवहारातील पाच भागिदारांची नावे जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे.

Political News: "तुमच्या प्रॉपर्टी सोडा बायका किती आहेत ते पण काढावं लागेल", शिरसाटांचं दानवेंच्या टीकेला उत्तर

Chhatrapati Sambhajinagar :  राज्याचे सामाजिक न्याज मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने  VITS नावाचं हॉटेल 67 कोटींना खरेदी केल्याचा समोर आलं आहे. या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. यावरून विरोधक संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानव यांनी संजय शिरसाट यांना हॉटेल खरेदी व्यवहारातील पाच भागिदारांची नावे जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे. यावर "तुमच्या प्रॉपर्टी सोडा बायका किती आहेत ते पण काढावा लागेल", असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले अंबादास दानवे?  

हॉटेल खरेदीच्या व्यवहारावर बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटलं की, मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी जे 5 पार्टनर आहेत त्यांची नावं जाहीर करावी. माझ्याकडे मोठी फाईल आहे, त्यात पार्टनर्सच्या नावांची यादी आहे. त्यांनी आधी नावं जाहीर करावी मग मी फाईल ओपन करतो.

(नक्की वाचा- महायुतीत कलह! प्रताप सरनाईकांचा राजीनामा घ्या', भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र!)

संजय शिरसाठ यांच्या मुलाने आणि 4 जणांनी मिळून हॉटेल घेतलं आहे. तुमचा मुलगा आणि अन्य कोण हे पेपर माझ्याकडे आहेत. ज्या निविदा दिल्या आहेत त्याची जाहिरात दिली आहे, असं तुम्ही बोललात. कुठल्या पेपरमध्ये ही जाहीरात आहे, हे सांगावं. इन्कम टॅक्स पेपर मी पाहिले. आणखी बरेच बरकावे आहेत. टेंडर मॅनेज करून घेतलं आहे. 2 जणांच्या घरातले पार्टनर आहेत. जर 2024 ला दिलेली अॅफिडेव्हिट आहे, तर त्यात सिद्धांत शिरसाट यांचा उल्लेख चुकीचं आहे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा : 'कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच..', माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान)

संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर

अंबादास दानवे यांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांनी म्हटलं की, त्यांना अजून अकलीचा पत्ता नाही. त्यांना विरोधीपक्ष नेते कुणी केलं हेच कळत नाही. एकदा अॅग्रीमेंट होऊ द्या, काय घाई झाली आहे तुम्हाला. त्या अॅग्रीमेंटमध्ये नाव कळतील ना, अजून 25 टक्के पैसे भरले नाहीत. त्यापूर्वीच बोंबलायला सुरुवात केली. कुठेतरी सेन्स ठेवा, की तुम्ही पण दारू प्यायला लागले. तुमच्या प्रॉपर्टी कुठे आहेत किती आहेत ते काढू का? तुमच्या प्रॉपर्टी सोडा बायका किती आहेत ते पण काढावं लागेल, असा इशाराच संजय शिरसाट यांनी दिला. 

डोक्याला ताण देऊ नका मी शांत आहे, पण गांX नाही. सगळ्यांची उत्तरं एका झटक्यात देऊ शकतो एवढी ताकद ठेवतो संजय शिरसाट, कुणाच्या बापाला घाबरत नाही जे काहीही करेल ते डंके की चोट पे करेल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com