
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने अनेक बसमार्गांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये काही मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतरण, मार्गांचा विस्तार, मार्गांमध्ये बदल आणि नवीन मार्ग सुरू करण्याचा समावेश आहे. या बदलांमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा आहे.
वातानुकूलित सेवांमध्ये वाढ आणि मार्गांमध्ये बदल
मार्ग क्र. ए ८ (A ८): मंत्रालय आणि शिवाजी नगर टर्मिनस दरम्यान धावणारा मर्यादित बसमार्ग क्र. ८ आता वातानुकूलित बस मार्ग 'ए ८' म्हणून ओळखला जाईल.
मंत्रालय येथून: पहिली बस सकाळी ८.०५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.५० वाजता सुटेल.
हुतात्मा चौक येथून: पहिली बस सकाळी ६.५५ वाजता आणि शेवटची बस सायंकाळी ७.४५ वाजता सुटेल.
शिवाजीनगर टर्मिनस येथून: मंत्रालय करिता पहिली बस सकाळी ६.५० वाजता आणि शेवटची बस रात्री ९.१५ वाजता सुटेल. हुतात्मा चौककरिता शेवटची बस सायंकाळी ६.१० वाजता असेल.
(नक्की वाचा - Thane News : हनीट्र्रॅपमध्ये अडकला इंजिनिअर! नौदलाची गोपनिय माहिती पाकिस्तानला शेअर केल्याबद्दल अटक)
मार्ग क्र. ए सी १० (AC 10): बॅकबे आगार आणि राणी लक्ष्मीबाई चौक (शीव) दरम्यान धावणाऱ्या या वातानुकूलित कॉरिडॉर बसमार्गाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा मार्ग आता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (म्युझियम) येथून हुतात्मा चौक, महात्मा फुले मंडई, भेंडी बाजार, महाराणा प्रताप चौक (माझगाव) मार्गे जाईल. रिझर्व्ह बँक, पी. डिमेलो रोड मार्गे असलेले प्रवर्तन रद्द करण्यात आले आहे. बॅकबे आगार येथून: पहिली बस सकाळी ६.३० वाजता आणि शेवटची बस रात्री ८.३० वाजता सुटेल.
राणी लक्ष्मीबाई चौक (शीव) येथून: पहिली बस सकाळी ७.३५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.०० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ११ मर्या. (11 Ltd.): नेव्हीनगर आणि वांद्रे वसाहत बसस्थानक (पूर्व) दरम्यान धावणाऱ्या या बसमार्गाचे संत ज्ञानेश्वर उड्डाणपूल (लालबाग) मार्गे परावर्तन करण्यात आले आहे. त्यामुळे जिजामाता उद्यान (राणीबाग), जयहिंद चित्रपटगृह आणि संत जगनाडे चौक (लालबाग) हे थांबे आता या मार्गावर नसतील.
मार्ग क्र. २५ मर्या. (25 Ltd.): प्रबोधनकार ठाकरे उद्यान बसस्थानक (शिवडी) ते विहार सरोवर दरम्यानचा हा मार्ग आता बसमार्ग क्र. २९ मर्या. म्हणून ओळखला जाईल.
प्र. ठाकरे उद्यान बसस्थानक (शिवडी) येथून: पहिली बस सकाळी ६.०० वाजता आणि शेवटची बस रात्री ९.३० वाजता सुटेल.
विहार सरोवर येथून: पहिली बस सकाळी ६.०० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.०५ वाजता सुटेल.
(नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video ))
मार्ग क्र. ए २५ (A 25): बॅकबे आगार आणि कुर्ला आगार दरम्यान धावणारा हा वातानुकूलित बसमार्ग आता बॅकबे आगार आणि राणी लक्ष्मीबाई चौक (शीव) दरम्यान धावेल. लोकमान्य टिळक रुग्णालय आणि कुर्ला आगार दरम्यानचे प्रवर्तन रद्द करण्यात आले आहे.
बॅकबे आगार येथून: पहिली बस सकाळी ५.१५ वाजता आणि शेवटची बस रात्री ९.२० वाजता सुटेल.
राणी लक्ष्मीबाई चौक (शीव) येथून: पहिली बस सकाळी ६.०० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.३० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ४४ (44): श्रावण यशवंते चौक (काळा चौकी) आणि वरळी आगार दरम्यानचा हा सर्वसाधारण बसमार्ग आता 'ए-४४' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
श्रावण यशवंते चौक (काळा चौकी) येथून: पहिली बस सकाळी ६.२५ वाजता आणि शेवटची बस रात्री ११.३० वाजता सुटेल.
वरळी आगार येथून: पहिली बस सकाळी ६.१५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.५० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ५६ (56): वरळी आगार आणि वेसावे यारी रोड बसस्थानक दरम्यान धावणाऱ्या या मार्गावर आता फक्त रविवारी वातानुकूलित बस (ए ५६) धावतील. सोमवार ते शनिवार या मार्गावर सर्वसाधारण बसेस धावतील.
वरळी आगार येथून: पहिली बस पहाटे ४.२० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.०० वाजता सुटेल.
वेसावे यारी रोड बसस्थानक येथून: पहिली बस सकाळी ५.१५ वाजता आणि शेवटची बस रात्री ११.२० वाजता सुटेल.
मार्ग क्र. सी ७१ (C 71): माहिम बसस्थानक आणि मिरारोड स्थानक (पूर्व) दरम्यान धावणाऱ्या या कॉरिडॉर बसमार्गाचा विस्तार काळाकिल्ला आगारापर्यंत करण्यात आला आहे. हा मार्ग आता काळाकिल्ला आगार आणि मिरारोड स्थानक (पूर्व) दरम्यान माहिम बसस्थानक मार्गे धावेल.
काळाकिल्ला आगार येथून: पहिली बस सकाळी ६.३५ वाजता आणि शेवटची बस रात्री ८.३० वाजता सुटेल.
मिरारोड स्थानक (पूर्व) येथून: पहिली बस सकाळी ६.३० वाजता आणि शेवटची बस सायंकाळी ७.१५ वाजता सुटेल.
(नक्की वाचा- Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर)
मार्ग क्र. ७९ (79): सांताक्रुझ आगार आणि गोराई आगार दरम्यानचा हा मार्ग आता सांताक्रुझ आगार आणि प्रबोधनकार ठाकरे नगर बसस्थानक (चारकोप) पर्यंतच धावेल. गोराई आगार आणि प्रबोधनकार ठाकरे नगर बसस्थानक (चारकोप) दरम्यानचे प्रवर्तन रद्द करण्यात आले आहे.
सांताक्रुझ आगार येथून: पहिली बस पहाटे ४.५० वाजता आणि शेवटची बस रात्री ११.३० वाजता सुटेल.
प्रबोधनकार ठाकरे नगर बसस्थानक (चारकोप) येथून: पहिली बस सकाळी ५.४५ वाजता आणि शेवटची बस मध्यरात्री १२.४० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए-८९ (A-89): मंत्रालय आणि वरळी आगार दरम्यान धावणाऱ्या या बसमार्गाचे फक्त रविवारचे प्रवर्तन रद्द करण्यात आले आहे. हा मार्ग आता सोमवार ते शनिवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीच धावेल.
मार्ग क्र. ए-१२४ (A-124): हा वातानुकूलित बसमार्ग पूर्वी सोमवार ते शनिवार कुलाबा बसस्थानक ते वरळी आगार आणि रविवारी कुलाबा आगार ते वरळी आगार असा धावत होता. आता हा मार्ग संपूर्ण आठवडा कुलाबा बसस्थानक ते वरळी आगार दरम्यान धावेल.
वरळी आगार येथून: पहिली बस सकाळी ५.५० वाजता आणि शेवटची बस रात्री ११.०० वाजता सुटेल.
कुलाबा बसस्थानक येथून: पहिली बस सकाळी ६.४५ वाजता आणि शेवटची बस मध्यरात्री १२.०५ वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए १२५ (A 125): नेव्हीनगर आणि वरळी आगार दरम्यानचा सर्वसाधारण बसमार्ग क्र. १२५ आता 'ए १२५' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे. तसेच, झकेरीया मस्जिद आणि जोहार चौक दरम्यान विजय वल्लभ चौक (पायधुनी) मार्गे असलेले प्रवर्तन रद्द करून हा मार्ग आता जोहार चौक येथून मोहम्मद अली रोड मार्गे दोन्ही दिशेने धावेल.
वरळी आगार येथून: पहिली बस सकाळी ५.५५ वाजता आणि शेवटची बस रात्री ९.१० वाजता सुटेल.
नेव्हीनगर येथून: पहिली बस सकाळी ७.१० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.५० वाजता सुटेल.
मार्ग क्र. १८१ (181): अॅन्टॉप हिल विस्तारीत आणि सीप्झ बसस्थानक दरम्यानचा हा मार्ग आता अॅन्टॉप हिल विस्तारीत आणि मरोळ आगार दरम्यानच धावेल. मरोळ आगार आणि सीप्झ बसस्थानक दरम्यानचे प्रवर्तन रद्द करण्यात आले आहे.
अॅन्टॉप हिल विस्तारीत येथून: पहिली बस सकाळी ७.२५ वाजता आणि शेवटची बस रात्री ९.०५ वाजता सुटेल.
मरोळ आगार येथून: पहिली बस सकाळी ७.२० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.३० वाजता सुटेल.
(नक्की वाचा- Digital Address ID: आता प्रत्येक घराचा असेल खास डिजिटल ID, सरकार लागू करणार 'आधार' सारखी प्रणाली)
मार्ग क्र. २१२ (212): प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) आणि वांद्रे रेक्लेमेशन बसस्थानक दरम्यान धावणाऱ्या या मार्गाचे वाडीया प्रसुतिगृह रुग्णालय आणि खोदादाद सर्कल (दादर टी.टी.) दरम्यान मडकेबुवा चौक आणि हिंदमाता चित्रपटगृह दरम्यान असलेले प्रवर्तन रद्द करून, हा मार्ग आता वाडीया प्रसुतिगृह रुग्णालय येथून भोईवाडा, स्प्रिंगमिल, शारदा चित्रपटगृह मार्गे परावर्तित करण्यात येत आहे.
प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून: पहिली बस सकाळी ६.४५ वाजता आणि शेवटची बस रात्री ८.५५ वाजता सुटेल.
वांद्रे रेक्लेमेशन बसस्थानक येथून: पहिली बस सकाळी ६.१० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.०० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए २४१ (A 241): माहिम बसस्थानक आणि मालवणी आगार दरम्यानचा सर्वसाधारण बसमार्ग क्र. २४१ आता सांताक्रूझ आगार आणि मालवणी आगार दरम्यान वातानुकूलित बसमार्ग 'ए २४१' म्हणून धावेल.
सांताक्रूझ आगार येथून: पहिली बस सकाळी ७.०० वाजता आणि शेवटची बस रात्री ११.०० वाजता सुटेल.
मालवणी आगार येथून: पहिली बस सकाळी ५.३५ वाजता आणि शेवटची बस रात्री ९.२० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए २४३ (A 243): हा सर्वसाधारण बसमार्ग आता 'ए-२४३' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
मालाड स्थानक (प) (आनंद मार्ग चौकी) येथून: पहिली बस सकाळी ६.२५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.३० वाजता सुटेल.
जनकल्याण नगर येथून: पहिली बस सकाळी ६.०५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.०० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ३४३ (A 343): गोरेगांव बसस्थानक (पूर्व) आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान संतोषनगर मार्गे धावणारा सर्वसाधारण बसमार्ग क्र. ३४३ आता 'ए-३४३' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
गोरेगाव स्थानक (पूर्व) येथून (चित्रनगरी करिता): पहिली बस सकाळी ६.०० वाजता आणि शेवटची बस रात्री ११.०० वाजता सुटेल.
गोरेगाव स्थानक (पूर्व) येथून (संतोष नगर करिता): पहिली बस पहाटे ४.५० वाजता आणि दुसरी सकाळी ५.५० वाजता सुटेल. शेवटची बस रात्री ११.२० आणि मध्यरात्री २.०० वाजता सुटेल.
संतोष नगर येथून (गोरेगाव स्थानक (पूर्व) करिता): पहिली बस पहाटे ४.३० वाजता आणि दुसरी सकाळी ६.१५ वाजता सुटेल. शेवटची बस रात्री ११.०० आणि मध्यरात्री १.४० वाजता सुटेल.
चित्रनगरी येथून (गोरेगाव स्थानक (पूर्व) करिता): पहिली बस सकाळी ६.२५ वाजता आणि शेवटची बस रात्री ११.२० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ३४४ (A 344): गोरेगांव बसस्थानक (पूर्व) आणि संकल्प सोसायटी नागरी निवारा प्रकल्प-४ दरम्यान धावणारा वर्तुळाकार बसमार्ग क्र. ३४४ आता 'ए-३४४' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
गोरेगांव बसस्थानक (पूर्व) येथून: पहिली बस सकाळी ५.१५ वाजता आणि शेवटची बस मध्यरात्री १२.०० वाजता सुटेल.
संकल्प सोसायटी नागरी निवारा प्रकल्प-४ येथून: पहिली बस पहाटे ५.०० वाजता आणि शेवटची बस रात्री ११.४० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ३४७ (A 347): गोरेगांव स्थानक (पूर्व) आणि गोकुळधाम दरम्यानचा सर्वसाधारण बसमार्ग क्र. ३४७ आता 'ए-३४७' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
गोरेगांव बसस्थानक (पूर्व) येथून: पहिली बस सकाळी ६.२० वाजता आणि शेवटची बस रात्री ११.०५ वाजता सुटेल.
गोकुळधाम येथून: पहिली बस सकाळी ६.०० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.४५ वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ३५७ (A 357): मुंबई सेंट्रल आगार आणि शिवाजीनगर बसस्थानक दरम्यान धावणारा हा वातानुकूलित बसमार्ग आता वसंतराव नाईक चौक (ताडदेव) आणि शिवाजीनगर बसस्थानक दरम्यान धावेल. वसंतराव नाईक चौक (ताडदेव) आणि मुंबई सेंट्रल आगार दरम्यानचे प्रवर्तन रद्द करण्यात आले आहे.
वसंतराव नाईक चौक (ताडदेव) येथून: पहिली बस सकाळी ६.३५ वाजता आणि शेवटची बस रात्री ११.४५ वाजता सुटेल.
शिवाजीनगर बसस्थानक येथून: पहिली बस सकाळी ५.२० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.१० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ३९९ (A 399): ट्रॉम्बे आणि मॅरेथॉन चौक (तीन हात नाका ठाणे) दरम्यान धावणारा बसमार्ग क्र. ३९९ मर्या. आता ट्रॉम्बे आणि महाराणा प्रताप चौक (मुलुंड) दरम्यान धावेल. महाराणा प्रताप चौक (मुलुंड) आणि मॅरेथॉन चौक (तीन हात नाका ठाणे) दरम्यानचे प्रवर्तन रद्द करण्यात आले आहे.
ट्रॉम्बे येथून: पहिली बस पहाटे ४.४५ वाजता आणि शेवटची बस रात्री ८.४५ वाजता सुटेल.
महाराणा प्रताप चौक (मुलुंड) येथून: पहिली बस सकाळी ५.४५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.१५ वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ४५२ (A 452): गोरेगांव बसस्थानक (पूर्व) आणि मयूर नगर रॉयल पाल्मस दरम्यानचा सर्वसाधारण बसमार्ग क्र. ४५२ आता 'ए-४५२' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
गोरेगांव बसस्थानक (पूर्व) येथून: पहिली बस सकाळी ५.३० वाजता आणि शेवटची बस मध्यरात्री १.०० वाजता सुटेल.
मयूर नगर येथून: पहिली बस सकाळी ५.१५ वाजता आणि शेवटची बस मध्यरात्री १२.४५ वाजता सुटेल.
मार्ग क्र. ४५६ (456): मालवणी आगार आणि शिवशाही प्रकल्प मंत्री पार्क दरम्यान धावणारा बसमार्ग क्र. ए-४५६ आता '४५६' या सर्वसाधारण वर्तुळाकार बससेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
मालवणी आगार येथून: पहिली बस सकाळी ६.०० वाजता आणि शेवटची बस रात्री ८.०५ वाजता सुटेल.
शिवशाही प्रकल्प मंत्री पार्क येथून: पहिली बस सकाळी ७.०० वाजता आणि शेवटची बस रात्री ९.१५ वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ४५९ मर्या. (A 459 Ltd.): मुलूंड रेल्वे स्थानक (प) आणि मालवणी आगार दरम्यानचा बसमार्ग क्र. ४५९ मर्या. आता 'ए-४५९' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
मुलूंड रेल्वे स्थानक (प) येथून: पहिली बस सकाळी ७.०० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.५५ वाजता सुटेल.
मालवणी आगार येथून: पहिली बस सकाळी ५.४५ वाजता आणि शेवटची बस रात्री ९.०५ वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ४८८ (A 488): शिवाजीनगर बसस्थानक आणि दिंडोशी आगार दरम्यान धावणाऱ्या या वातानुकूलित बसमार्गाचे घाटकोपर पाईपलाईन आणि डॉ. दत्ता सामंत चौक दरम्यान कुर्ला अंधेरी मार्गे असलेले प्रवर्तन रद्द करून, हा मार्ग आता संत नरसी मेहता मार्ग येथून माणेकलाल म्युनिसिपल स्कूल, जागृती नगर, जांभुळपाडा, असल्फा गांव, डॉ. दत्ता सामंत चौक मार्गे परावर्तित करण्यात येत आहे.
शिवाजीनगर बसस्थानक येथून: पहिली बस सकाळी ५.२५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.१५ वाजता सुटेल.
दिंडोशी आगार येथून: पहिली बस सकाळी ६.४० वाजता आणि शेवटची बस रात्री ११.५५ वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ६०२ (A 602): कांजूरमार्ग स्थानक (प) आणि हिरानंदानी (पवई) बसस्थानक दरम्यानचा सर्वसाधारण बसमार्ग क्र. ६०२ आता 'ए-६०२' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
कांजूरमार्ग स्थानक (प) येथून: पहिली बस सकाळी ५.३० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.४० वाजता सुटेल.
हिरानंदानी (पवई) बसस्थानक येथून: पहिली बस सकाळी ५.५० वाजता आणि शेवटची बस रात्री ११.०० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए ६२६ (A 626): मालाड स्थानक (प) (आनंद मार्ग चौकी) आणि भुजाले तलाव दरम्यानचा सर्वसाधारण बसमार्ग क्र. ६२६ आता 'ए-६२६' या वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्यात आला आहे.
मालाड स्थानक (प) (आनंद मार्ग चौकी) येथून: पहिली बस सकाळी ६.०० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.०५ वाजता सुटेल.
भुजाले तलाव येथून: पहिली बस सकाळी ६.१० वाजता आणि शेवटची बस रात्री १०.१५ वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए १८० (A 180): छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मालवणी आगार दरम्यान बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर उड्डाणपुलामार्गे असलेले प्रवर्तन रद्द करून, हा मार्ग आता बहार चित्रपटगृह येथून प्राध्यापक ना. सी. फडके मार्ग, गोखले उड्डाणपूल, स्वामी विवेकानंद मार्गे पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
नवीन बसमार्ग
मार्ग क्र. ए १७५ (A 175): प्रतिक्षानगर आगार आणि प्रबोधनकार ठाकरे उद्यान (पोर्तुगीज चौक दादर) दरम्यान अॅन्टॉप हिल, वडाळा चर्च, खोदादाद सर्कल, राम गणेश गडकरी चौक मार्गे नवीन वर्तुळाकार वातानुकूलित बसमार्ग क्र. ए १७५ सुरू करण्यात येत आहे.
प्रतिक्षानगर आगार येथून: पहिली बस सकाळी ७.०० वाजता आणि शेवटची बस रात्री ९.२० वाजता सुटेल.
मार्ग क्र. ए-४९० (A-490): मंत्रालय आणि दादलानी पार्क, बाळकूम - ठाणे (प.) दरम्यान पूर्व मुक्त मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्गावरून नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र. ए-४९० सुरू करण्यात येत आहे. हा मार्ग संपूर्ण दिवस धावणार नसून, या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळ बसफेऱ्या चालवण्यात येतील.
मंत्रालय येथून: बसफेऱ्या सायंकाळी ५.३० आणि ६.०० वाजता सुटतील.
दादलानी पार्क, बाळकूम - ठाणे (प.) येथून: बसफेऱ्या सकाळी ७.३० आणि ८.०० वाजता सुटतील.
बेस्टच्या या नवीन बदलांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि त्यांना चांगल्या दर्जाची सेवा मिळेल, अशी आशा आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world