Pune News: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात बदल? शेतकऱ्यांच्या जमिनीचं काय? बैठकीत राधाकृष्ण विखे-पाटील काय म्हणाले

Pune News: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प आणि राहुरी-शनी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे प्रकल्पांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Pune Nashik Rail Project: पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत मोठा निर्णय"
Radhakrishna Vikhe Patil X

Pune News: पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याच्या निर्देश जलसंपदा  (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प आणि राहुरी-शनी शिंगणापूर प्रस्तावित मार्गामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला कडक निर्देश दिले. "शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत, त्यांचा हा त्याग विसरणे योग्य नाही," असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

(नक्की वाचा: Pune News : रांजणगाव गणपती मंदिरासमोर सर्वात भयानक घटना! पुणे-अहिल्यानगरच्या प्रवाशांची पळापळ)

पुणतांबा जंक्शनवर रेल्वे थांबा आणि रस्त्यांचे प्रश्न | Rail Stoppage at Puntamba Junction and Road Connectivity

पुणतांबा-शिर्डी मार्गावरील रेल्वे गाड्यांना पुणतांबा जंक्शन येथे थांबा मिळावा, अशी प्रमुख मागणी या बैठकीत करण्यात आली. तसेच, रेल्वे दुहेरीकरणाच्या कामामुळे आणि प्रशासनाने घातलेल्या कुंपणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता, बोगदा किंवा इतर सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश विखे-पाटील यांनी दिले.

Advertisement

(नक्की वाचा : Maharashtra Rain Update: अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस राज्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस; या ठिकाणी फटका बसण्याची शक्यता)

GMRT वेधशाळा आणि मार्गातील बदल | GMRT Observatory and Alignment Changes

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या सादरीकरणादरम्यान खोडद येथील GMRT (Giant Metrewave Radio Telescope) वेधशाळेच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी रेल्वे मार्गाचे संरेखन (Alignment) बदलण्यावर चर्चा झाली. वेधशाळेच्या अँटेना परिसरापासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी रेल्वे प्रशासन पर्यायी मार्गाचा विचार करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता, बोगदा किंवा इतर सोयी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीस अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, पुणतांबा, राहुरी, संगमनेर, अकोले परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.