Maharashtra Rain Update: महाराष्ट्रातील बळीराजावर पुन्हा एकदा निसर्गाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीला आलेली असतानाच हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. 17 मार्च ते 20 मार्च या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याला सर्वाधिक फटका | Maharashtra Rain Update News
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, या पावसाचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल.18 मार्च ते 20 मार्चदरम्यान पावसाची तीव्रता अधिक वाढणार आहे, काही भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. यादरम्यान आकाशात विजांचा कडकडाट होऊन जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. काही संवेदनशील पट्ट्यांमध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.
(नक्की वाचा: Thane News: मुंबई-नाशिक हायवेवर मोठी कारवाई! तब्बल 2,364 बॉक्स दारू सापडली; 2,00,30,800 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त)
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे आवाहन | Rain In Maharashtra Update News | IMD Alert For Maharashtra
सध्या राज्यात रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अशातच येणाऱ्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: LPG Cylinder Supply: राज्यात LPGचा तुटवडा झालाय का? सिलिंडर मिळणार नाही का? प्रशासनाने दिली मोठी माहिती)

Photo Credit: NDTV Marathi
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world