Pune-Nashik News : पुणे आणि नाशिकमध्ये कशी आहे स्थिती? दोन्ही जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट

पुण्यातील एकता नगर भागात अजूनही पाणी कायम आहे. एकता नगर भागातील जवळपास सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात आहे.  अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी कालपासून एकता नगरमध्ये मुक्कामी आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे शहरासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल संध्याकाळनंतर पुण्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच आहे. 

पुण्यातील एकता नगर भागात अजूनही पाणी कायम आहे. एकता नगर भागातील जवळपास सर्व नागरिकांचे स्थलांतर करण्यात आहे.  अग्निशमन दल आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी कालपासून एकता नगरमध्ये मुक्कामी आहेत. पुण्यात पावसाचे विश्रांती घेतली आहे मात्र एकता नगरमधील परिस्थिती जैसे थे आहे. 

कुठल्या धरणातून सध्या किती विसर्ग सुरू?

  • खडकवासला: 45702 क्युसेक
  • पानशेत: 10500 क्युसेक
  • वरसगाव: 10102 क्युसेक

नाशिकमध्ये कशी आहे स्थिती?

नाशिकमधील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र गंगापूर धरणातून 8 हजार 100 क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.रामकुंड परिसरात रात्री पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्य रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. विशेष म्हणजे पहिला श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी आहे. जोरदार पाऊस असल्याने भाविकांची गैरसोय होते आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस सुरु आहे. सध्या दारणा, भावली, कडवा, भाम, वालदेवी, पालखेडसह नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article