- कुरकुंभ एमआयडीसीमध्ये अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठ्या प्रमाणावर क्लोरल हायड्रेट जप्त केला आहे
- संशयित फॅक्टरीमध्ये 3420 किलो क्लोरल हायड्रेट आणि 5800 लिटर रॉ केमिकल सापडले
- या केमिकलपासून विषारी दारूची निर्मिती केली जाते, आरोपींना पकडण्यात आले आहे
देवा राखुंडे
एक हादरवून टाकणारी आणि तेवढीच चिंतेची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. विषारी दारू निर्मितीसाठी वापरलं जाणारं 3 हजरा 420 किलो क्लोरल हायड्रेट आणि क्लोरल हायड्रेट निर्मितीसाठी लागणार पाच हजार आठशे लिटर रॉ केमिकल देखील या कारवाई जप्त केलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे साहित्य जमा केलं गेलं होतं. हे साहित्य म्हणजे जणू मृत्यूचा सापळाच होता. मात्र तो चोराटी मार्गे बाजारात जाण्या आधीच टास्क फोर्सने त्यावर टाच आणली आहे. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
कुरकुंभ एमआयडीसीमध्ये समर्थ लॅबोरेटरीज आहे. या ठिकाणी एनडीपीएस गुन्ह्यातील आरोपी किशोर सुर्वे याच्या फॅक्ट्री परिसरात हा साठा आढळून आला आहे. या फॅक्टरीत शैलेश ठाकूर हा चोरून एम.डी.ड्रग बनवत होता. याबाबत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभागास गोपनीय माहिती मिळाली होती. त्याची खातरजमा ही करण्यात आली. त्यानंतर एक मोठी मोहीत टास्क फोर्सने हाती घेतली. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कृती विभागाने या ठिकाणी जवळपास दीड महीने बारीक लक्ष ठेवले. त्यानंतर 29 जुन 2026 रोजी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सुमारे 3420 किलो वजनाचा पिवळया रंगाचा स्फटीक सदृश्य पदार्थ सापडला. तसेच ते तयार करण्याकरीता लागणारे 5800 लिटर रॉ केमिकल मिळून आले. या कारवाईने एकच खळबळ उडाली.
ही फॅक्टरी किशोर दत्तात्रय सुर्वे, शैलेश विठ्ठल ठाकुर, नबी सरवर जमीर सिध्दीकी आणि आदेश विठ्ठल पाचांगणे हे चालवत असल्याचं तपासात समोर आलं आहे. ही फॅक्ट्री संशयीत इसम किशोर दत्तात्रय सुर्वे यांच्या मालकीची असल्याचे ही तपासात निष्पन्न झाले आहे. किशोर सुर्वे विरुध्द NDPS Act अंतर्गत यापुर्वी गुन्हा दाखल आहे. या ठिकाणी मिळून आलेले केमिकल हे शैलेश ठाकूर यानेच बनविले असल्याचे ही स्पष्ट झाले आहे. या कारवाईमध्ये एकूण 3420 किलो वजनाचा फिकट पिवळ्या पांढऱ्या रंगाचे स्फटीकासारखा संशयीत पदार्थ मिळाला आहे. ते तयार करण्याकरीता लागणारे 5800 लिटर रॉ केमिकल मिळुन आले आहे.
या ठिकाणी एम.डी. आणि मेफेड्रॉन या अंमली पदार्थाचे उत्पादन करण्याकरीता आवश्यक असलेले सेट्रीफ्युगल मशीन तसेच GLR मशीन मिळुन आले आहेत. आता या संशयीत पदार्थाची न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे येथे तपासणी करण्यात आली आहे. त्यांचकडून अहवाल ही मिळाला आहे. त्यात संशयीत पदार्थामध्ये प्रतिबंधीत करण्यात आलेले क्लोरल हायड्रेट हे केमिकल असल्याचे आढळून आलेले आहे. या क्लोरल हायड्रेट पासून विषारी दारुची निर्मीती केली जाते. 3420 किलो क्लोरल हायड्रेट पासुन सुमारे 15 लाख लिटर विषारी दारुची निर्मीती केली जाऊ शकते. या ठिकाणी जप्त करण्यात आलेले सेट्रीफ्युगल मशीन तसेच GLR मशीन यांची किंमत अंदाजे 1 कोटी इतकी आहे.
ही कारवाई ही अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग,पुणे,विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स,पुणे, पोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स,पुणे, पोलीस अधीक्षक (कृती) अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे, अपर पोलीस अधीक्षक (कृती), अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स,पुणे, पोलीस उपअधीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभागाचे पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world