Pune News: भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांवर महिलांसंबंधित गुन्हे दाखल; पण एकालाही अटक नाही

Pune News : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र भाजपच्या सलग दोन महिला-संबंधित प्रकरणांमुळे अडचणी वाढवल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

Pune News : भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर महिला संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. मात्र दोन्ही पदाधिकाऱ्यांना अद्याप अटक झालेला नाही. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण मिळतंय का अशी चर्चा सुरु झाली आहे. यावरून भाजपावर विरोधक हल्लाबोल करत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र भाजपच्या सलग दोन महिला-संबंधित प्रकरणांमुळे अडचणी वाढवल्या. पुण्यातील दोन वेगवेगळ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर महिलांविरुद्ध गैरवर्तनाचे आरोप झाले आहेत. त्यातील एका प्रकरणात पुणे शहर भाजपचे सरचिटणीस प्रमोद कोंढारे यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे.

(नक्की वाचा-  Kolhapur News : मुश्रीफांना शेतकरी फसवणूक प्रकरणात दिलासा, अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाचा आदेश)

कोंढांरे यांच्यावर 14 जून रोजी एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनी पक्षाकडे आपली बाजू मांडत राजीनामा दिला आहे. यावर भाजप महिला प्रश्नांबाबत अतिशय संवेदनशील आहे. आम्ही महिलांचा आदर करतो. कोंधारे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच पदाचा राजीनामा दिला आहे, अशी भूमिका पक्षाने स्पष्ट केली.

तर दुसऱ्या प्रकरणात 17 जून रोजी पुणे महापालिकेचे कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष ओमकार कदम यांच्याविरोधात दोन महिला अधिकाऱ्यानी विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षांनी या दोनही प्रकरणांचा आधार घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय की, भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर सलग महिलांविरोधात गुन्हे दाखल होणे धक्कादायक आहे. हे भाजपमध्ये काय सुरू आहे याचे लक्षण आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा )

अद्याप कुणालाही अटक नाही

पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सुरू केला असून पीडित महिलांचे जबाब नोंदवले जात आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की घटना गंभीर असून, पुरावे तपासले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी भूमिका स्पष्ट होईल. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

Topics mentioned in this article