जाहिरात

Pune News : जर्मनीत शिक्षण, पुण्यात मराठी शाळेत प्रवेश; दहावीत ओजसी ओगलेच्या कामगिरीने थक्क व्हाल!

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. मात्र यामध्ये पुण्यातील एक नाव चर्चेत आहे. हे नाव आहे ओजसी ओगले.

Pune News : जर्मनीत शिक्षण, पुण्यात मराठी शाळेत प्रवेश; दहावीत ओजसी ओगलेच्या कामगिरीने थक्क व्हाल!

Pune News : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. मात्र यामध्ये पुण्यातील एक नाव चर्चेत आहे. हे नाव आहे ओजसी ओगले. पुण्याच्या ओजसी ओगले हिने अनोखी कामगिरी करून दाखवली आहे. जर्मनीत प्राथमिक शिक्षण घेतलेलं असतानाही पुण्यात आल्यावर तिने मराठी माध्यमातून पुढील शिक्षण घेतलं अन् चक्क १०० टक्के गुणांची लक्षवेधी कामगिरी केली आहे. आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावे असा अट्टाहास करणाऱ्या पालकांच्या तुलनेत ओजसी ओगलेच्या पालकांनी एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. 

प्राथमिक शिक्षण जर्मनी; मात्र पुण्यात आल्यावर मोठा निर्णय...

ओजसीचा जन्म जर्मनीचा. तिचं चौथीपर्यंतचं शिक्षण जर्मनीतच झालं. कोरोना काळात ओजसीच्या पालकांनी भारतात परतायचं ठरवलं. पुण्यात आल्यावर त्यांनी ओजसीला एका मराठी माध्यमातील शाळेत घातलं. ओजसीचं पुढील शिक्षण पुण्यातील मा. सं. गोळवलकर या शाळेत झालं. आतापर्यंत जर्मन भाषेतून शिक्षण घेणाऱ्या ओजसीने थेट मराठी माध्यमातून शिक्षण सुरू केलं. सुरुवातील तिला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. मात्र पालकांनी तिची चांगली तयारी करून घेतली. नववी-दहावीला तिचं शिक्षण सेमी इंग्रजीत झालं. आता दहावीला तिला १०० टक्के गूण मिळाले आहेत. ओजसीने यासाठी शाळेतील शिक्षकांना श्रेय दिलं आहे. ओजसीने विज्ञान आणि गणितासाठी शिकवली लावली होती. या काळात तिची कथ्थक आणि हार्मोनियमची शिकवणी सुरू होती. 

नक्की वाचा - Pune News : तुमच्या आयुष्यातील 'हे' मोठे निर्णय पोलिसांना सांगणं बंधनकारक; सुरक्षेसाठी पुणे आयुक्तालयाचा आदेश


जर्मनीत असतानाही मराठीचे धडे...

ओजसीचे वडील अमोल अभियंता आहेत, ते एका खासगी कंपनीत नोकरी करतात. जर्मनीत असतानाही मुलीला मराठीचे धडे दिल्याचं त्यांनी सांगितलं. मातृभाषेत शिक्षण घेतल्याचा नक्कीच फायदा होतो. आयुर्वेदीत संशोधनात करिअर करण्याची ओजसची इच्छा आहे. त्यामुळे अकरावीला ती विज्ञान शाखेत प्रवेश करणार आहे. लोकसत्ताने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com