जाहिरात

Pune News : तुमच्या आयुष्यातील 'हे' मोठे निर्णय पोलिसांना सांगणं बंधनकारक; सुरक्षेसाठी पुणे आयुक्तालयाचा आदेश

सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्यातील शहर पोलीस आयुक्तालयाकडून महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. 

Pune News : तुमच्या आयुष्यातील 'हे' मोठे निर्णय पोलिसांना सांगणं बंधनकारक; सुरक्षेसाठी पुणे आयुक्तालयाचा आदेश

Pune News : पुण्यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. याशिवाय इतर राज्यातील तरुणवर्ग नोकरीच्या शोधात पुणं गाठतात. त्यामुळे पुण्यात भाडेकरू आणि पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सुरक्षिततेच्या कारणास्तव पुण्यातील शहर पोलीस आयुक्तालयाकडून महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. 

सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणे पोलीस आयुक्तालयाचे महत्त्वाचे आदेश 

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. पुण्यात येऊन भाडेतत्वावर राहणाऱ्या, एखाद्या व्यक्तीच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सुरक्षिततेसाठी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात भाडेतत्त्वावर घर देणे, पेईंग गेस्ट ठेवणे, वापरलेल्या वाहनांची खरेदी-विक्री अथवा तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देताना संबंधितांची माहिती पोलिसांना देणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे.

नक्की वाचा - Pune News : 9 वर्षांची लेक रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत होती, बापाने राहतं घर दिलं पेटवून; जन्मदाता का झाला वैरी?

शहर आयुक्तालयातील विशेष शाखेकडून यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. घरमालक, भाडेकरू, पेईंग गेस्ट, सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे संरक्षक, इस्टेट एजंट, वापरलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीतील एजंट, तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त यांनी संबंधित व्यक्तींची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात सादर करणं आवश्यक असेल. हा आदेश शहरातील सर्व घरमालक, भाडेकरू आणि वाहनधारकांना लागू असणार आहे. समाजविघातक आणि राष्ट्रविघातक कारवायांना प्रतिबंध घालणे, सार्वजनिक शांतता अबाधित राखणे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com