जाहिरात

Pune News : पुण्यात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार; CNG च्या दरात पुन्हा वाढ, लवकरच शंभरी गाठणार?

पुण्यात CNG च्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Pune News : पुण्यात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार; CNG च्या दरात पुन्हा वाढ, लवकरच शंभरी गाठणार?

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : इराण-अमेरिका संघर्षामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसात अनेक वेळा दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असून भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूही महागल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यात CNG च्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

CNG चे दर शंभरीच्याजवळ...

एमएनजीएलकडून सीएनजीच्या किरकोळ विक्री दरात प्रति किलो २ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचा दर ९२ रुपये २५ पैशांवरून ९४ रुपये ७५ पैसे प्रति किलो झाला आहे. हे वाढीव दर २७ मेच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. इनपुट गॅसच्या वाढलेल्या खर्चामुळे दरवाढ करण्यात आल्याचे एमएनजीएलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या इंधन दरवाढीमुळे सीएनजी दरवाढीचा फटका वाहनचालकांना बसणार आहे. परिणामी रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या प्रवास खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंधन दरवाढीमुळे  सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असल्याची चिन्ह आहेत. 

नक्की वाचा - Shirdi News : इंदुरीकर महाराजाचा जावई चर्चेत; लाखोंच्या कारवरील 'ते' स्टिकर्सपाहून अनेकांनी भुवया उंचावल्या!

सध्या पुण्यात पेट्रोल १११.५२ रुपये प्रतिलीटर आहे. याशिवाय सीएनजी ९४.७५ रुपये प्रतिकिलो. त्यामुळे सीएनजी आणि पेट्रोलच्या किमतीत १६.७७ रुपयांचा फरक आहे. त्यामुळे लवकरच सीएनजी शंभरी गाठणार का, अशी भीती ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com