जाहिरात

Pune News: पुण्यातील शिंदेवाडीतील लोक प्रचंड दहशतीत, मुळीच एकटे फिरू नका कारण ही आहे भीती

Pune News: पुण्यातील शिंदेवाडीतील स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. परिसरात एकट्याने फिरू नये, असे आवाहन स्थानिकांना करण्यात आलंय.

Pune News: पुण्यातील शिंदेवाडीतील लोक प्रचंड दहशतीत, मुळीच एकटे फिरू नका कारण ही आहे भीती
"Pune News: पुणेकर दहशतीत, कारण..."
Canva

Pune News: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथून जवळच असलेल्या शिंदेवाडीतील स्थानिक दहशतीखाली वावरत आहेत. 22 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक धास्तावले आहेत. वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांनी केलीय. 

सावध राहा, एकट्याने फिरू नका | Leopard News

शिंदेवाडी येथे गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका स्थानिकाला द्राक्षांच्या बागेमध्ये औषध फवारणी करत असताना बिबट्या दिसला. घाबरून न जाता या प्रसंगाचा त्याने धाडसाने सामना केला आणि बिबट्याचा व्हिडीओ काढला. सुरुवातीला रानमांजर किंवा तरस असल्याचे वाटल्याने त्याने याकडे दुर्लक्ष केले. कुलदीप पवार यांना द्राक्षांच्या बागांमध्ये बिबट्या दिसला. कुलदीप पवार यांनी शिंदेवाडीचे पोलीस पाटील स्वप्नील शिंदे यांना याबाबत माहिती दिली.  

वनविभागाची टीम गावात दाखल | Pune News

बिबट्या आहे की अन्य कोणता प्राणी? याबाबत तपासणी करण्यासाठी वन विभागाची टीम शिंदेवाडीत दाखल झालीय. पण लोकांनी सावधगिरी बाळगावी, रात्री एकटे फिरू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. 

(नक्की वाचा: Ladki Bahin E KYC: लाडक्या बहिणी E-KYC प्रक्रियेमुळे त्रस्त; समस्येचं उत्तर सापडेना, दीड हजारांचा हप्ता मिळेना)

स्थानिकांमध्ये दहशत

स्वप्नील शिंदे यांनी वन विभागाशी संपर्क साधल्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याच्या ठशांच्या तपासणीचे काम वन विभागाकडून सुरू आहे. बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com