जाहिरात

Pune News: सोज्वळ चेहरा अन् क्रूर मन! पत्नीला संपवून शुभमने रचला होता खतरनाक प्लॅन; पण पुणे पोलिसांनी...

Pune News: पुण्यातून एक अशी घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण शहर हादरवून सोडलं आहे.

Pune News: सोज्वळ चेहरा अन् क्रूर मन! पत्नीला संपवून शुभमने रचला होता खतरनाक प्लॅन; पण पुणे पोलिसांनी...
Pune Crime News : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

अजिंक्य धायगुडे-पाटील, प्रतिनिधी

Pune News: एका सुखी संसाराचा अंत इतक्या भयानक पद्धतीने होईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. पुण्यातून एक अशी घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण शहर हादरवून सोडलं आहे. एखाद्या वेब सिरीजलाही लाजवेल असा बनाव एका व्यक्तीनं त्याच्या बायकोचा जीव घेतल्यानंतर रचला. गॅलरीतून पडून मृत्यू झाल्याचा कांगावा करणाऱ्या या पतीचा सोज्वळपणाचा आव पोलिसांनी काही तासांतच मोडीत काढला आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला.

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी शुभम श्रीकांत घोडके (वय 29) नावाच्या तरुणाला अटक केली आहे, तर त्याची पत्नी सारिका घोडके (वय 23) हिचा या हिंसाचारात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सारिका आणि शुभम यांचं लग्न होऊन अवघे काही महिनेच झाले होते, मात्र या अल्पशा काळातच संशयाच्या पिशाचाने एका हसत्याखेळत्या घराची राखरांगोळी केली.

काय आहे प्रकरण?

शुभम आणि सारिका यांच्यात लग्नानंतर काही दिवसांतच खटके उडू लागले होते. शुभम त्याची पत्नी सारिका हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. याच कारणावरून 24 मार्च रोजी त्यांच्यात पुन्हा एकदा जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात शुभमने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सारिकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. 

Latest and Breaking News on NDTV

इतक्यावरच न थांबता त्याने स्वयंपाकघरातील साहित्याने तिच्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात सारिका रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

( नक्की वाचा : Chandrapur News: चंद्रपुरात क्रिकेट स्पर्धेत मृत्यूचे तांडव ! मॅच सोडून जीव वाचवण्यासाठी पळत सुटले प्रेक्षक )
 

अपघाताचा बनाव आणि पोलिसांची दिशाभूल

पत्नीचा जीव गेल्यानंतर शुभमने स्वतःला वाचवण्यासाठी एक कुटील डाव रचला. त्याने सारिकाला तातडीने रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

पोलिसांनी विचारणा केल्यावर शुभमने अत्यंत शांतपणे सांगितलं की, सारिका गॅलरीतून खाली पडली आणि तिचा अपघाती मृत्यू झाला. पोलिसांचा संशय टाळण्यासाठी तो रुग्णालयात अत्यंत सोज्वळपणे वागत होता. मात्र, सारिकाच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहताच पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

( नक्की वाचा : Court Verdict : खाकीला फाशीचा डाग! बाप-लेकाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा, काय आहे प्रकरण? )

.... आणि गुन्ह्याची कबुली

बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. जेव्हा पोलिसांनी शुभमची पुन्हा उलटतपासणी केली, तेव्हा त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. तो वारंवार आपली उत्तरं बदलत होता आणि अडखळत होता. अखेर पोलिसांनी जेव्हा तांत्रिक पुरावे समोर ठेवले आणि आपला हिसका दाखवला, तेव्हा शुभमचा बांध फुटला. त्याने रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याचं मान्य केलं. सध्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com