जाहिरात

Pune News : पुण्यात कॉर्पोरेट छळाचा बळी, TCS च्या 2 महिला अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून IT इंजिनिअरचा गळफास!

Pune News : पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Pune News : पुण्यात कॉर्पोरेट छळाचा बळी, TCS च्या 2 महिला अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून IT इंजिनिअरचा गळफास!
Pune News : पुण्यातील TCS कंपनीत धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडीमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि एका मित्राकडून मिळणारा त्रास, या सगळ्याला कंटाळून एका आयटी अभियंत्याने स्वत:चं  आयुष्य संपवलंय.

अमित ब्राम्हे असे या दुर्दैवी अभियंत्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरातील आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी प्रसिद्ध आयटी कंपनी टीसीएसमधील 2 वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुसाईड नोटमधून छळाची भीषणता उघड

पुण्यातील आयटी क्षेत्र हादरवून टाकणारी ही घटना 2 जून रोजी घडली. 48 वर्षीय आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अमित यांच्या या टोकाच्या पावलामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुरुवातीला कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारणातून ही घटना घडली असावी असा अंदाज होता, मात्र आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहिलेल्या 2 पानांच्या सुसाईड नोटने या प्रकरणाला वेगळे वळण दिले. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी या मृत्यूला कारणीभूत असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहून ठेवली आहेत.

( नक्की  वाचा : Badlapur News: 48 वार करून महिलेचा खून, नंतर स्वतःवर केले 8 वार; बदलापुरातील घटनेने सर्वच सून्न, वाचा सविस्तर )

वरिष्ठ महिला सहकाऱ्यांवर गंभीर आरोप

अमित ब्राम्हे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील त्यांच्या वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी या दोघींकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचा पाढाच त्यांनी या नोटमध्ये वाचला आहे. चालू असलेले चांगले प्रोजेक्ट्स अचानक काढून घेणे, जाणूनबुजून अत्यंत कठीण कामे देऊन कोंडी करणे, इतर सहकाऱ्यांसमोर वारंवार अपमान करणे आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकणे, असा छळ या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला आहे.

मित्रानेही केली कंपनीत बदनामी

या छळासोबतच अमित ब्रम्हे यांचा मित्र विनोद पालीचा हा देखील त्यांच्या त्रासाला कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. विनोदने अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि कंपनीत त्यांची नाहक बदनामी केली, असा उल्लेखही या सुसाईड नोटमध्ये आढळला आहे. ऑफिसमधील अंतर्गत राजकारण, कामाचा ताण आणि मित्राकडून झालेली बदनामी या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अमित यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Palghar News : डहाणू ते लंडन लव्ह जिहादचे भयंकर कनेक्शन! हिंदू मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या नेटवर्कची Inside Story )

भोसरी पोलिसांकडून गुन्हा दाखल

अमित ब्राम्हे यांच्या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी दोन्ही वरिष्ठ महिला अधिकारी आणि मित्र विनोद पालीचा या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. 

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आयटी क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, अंतर्गत राजकारण आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com