सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
Threat to blow up School: हिंजवडी फेज 1 मधील एका आंतरराष्ट्रीय नामांकित शाळेला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ही घटना समोर येताच शाळा प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता तातडीने पिंपरी चिंचवड पोलिसांना याची माहिती दिली आहे.
शाळेला मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेल प्राप्त होताच, शाळेमध्ये उपस्थित असलेल्या सुमारे 390 विद्यार्थ्यांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. शाळा पूर्णपणे खाली करण्यात आली.
(नक्की वाचा- VIDEO: लॉटरीच्या नावाखाली मराठी माणसांची फसवणूक! साताऱ्यात 'उत्तर भारतीय' टोळीचा भांडाफोड; पाहा व्हिडीओ)
शाळा प्रशासनाने तातडीने पिंपरी चिंचवड शहर पोलीस याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शाळेत कसून तपासणी सुरू केली आहे. तसेच, धमकी देणाऱ्या ई-मेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर पोलीस विभागाने तपास सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, शाळेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे.