Pune Crime News : पुण्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
(नक्की वाचा- Ahilyanagar News : महिलांना आमिष देऊन ढाबा, बारमध्ये नाचवायचा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला होता. पीडित महिलेने कुरिअर माझे नाही असे सांगितले, तरीही सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले. त्यामुळे तरुणीने घराचा सेफ्टी दरवाजा उघडला. त्यानंतर आरोपीने तोडांवर पेपर स्प्रे मारला.
(नक्की वाचा- Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले)
त्यानंतर आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. आरोपीने एवढ्यावरच न थांबता घटनेनंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि परत येईन असे टाईप करुन ठेवले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.