जाहिरात

Pune News : घायवळ गँगचा म्होरक्या पुणे पोलिसांच्या जाळ्यात; कोथरूडमधील दहशत संपवण्यासाठी मोठी कारवाई

Pune News: पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड सचिन घायवळला राजस्थानमधून बेड्या ठोकल्या आहेत.

Pune News : घायवळ गँगचा म्होरक्या पुणे पोलिसांच्या जाळ्यात; कोथरूडमधील दहशत संपवण्यासाठी मोठी कारवाई
Pune News: सचिन घायवळचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत गंभीर आहे.
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News: पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड सचिन घायवळला राजस्थानमधून बेड्या ठोकल्या आहेत. निलेश घायवळचा भाऊ असलेला सचिन राजस्थानमध्ये स्वत:ची ओळख आणि वेशभूषा बदलून राहत होता, मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत त्याला जेरबंद केले.

नाव बदलून राजस्थानमध्ये वास्तव्य

कोथरूड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या घायवळ टोळीतील महत्त्वाचा दुवा असलेला सचिन घायवळ पोलिसांना गुंगारा देऊन राजस्थानमध्ये लपला होता. स्वतःची ओळख पटू नये यासाठी त्याने नाव आणि पेहरावही बदलला होता. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने राजस्थानमध्ये सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला पुण्यात आणण्यात आले असून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयानं त्याला सहा दिवसांची म्हणजेच 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

( नक्की वाचा : Pune News: पुण्यातील बड्या आयटी कंपनीत 'कॉर्पोरेट जिहाद'? लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी महिला कर्मचाऱ्याचा छळ )

खंडणीपासून मकोकापर्यंत 11 गंभीर गुन्हे

सचिन घायवळचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत गंभीर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्यावर आतापर्यंत तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील गुन्ह्यांचा समावेश आहे

  • कोथरूड गोळीबार प्रकरण आणि मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई.
  • कोथरूड परिसरातील 10 फ्लॅट बळकावल्याचा गंभीर आरोप.
  • खंडणी, जबरी मारहाण, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी देणे.
  • बेकायदेशीर शस्त्रास्त्र बाळगणे आणि संघटित गुन्हेगारी टोळी चालवणे.

राजकीय संबंधांची चर्चा 

सचिन घायवळच्या अटकेमुळे पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याचे पुण्यातील काही राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याची चर्चा असून, पोलीस आता त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि गुन्हेगारी नेटवर्कची सखोल चौकशी करत आहेत. या चौकशीतून घायवळ गँगच्या इतर कारवायांबाबत आणि त्यांना मदत करणाऱ्यांबाबत मोठी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

( नक्की वाचा : NEET Paper Leak: 'नीट'मध्ये कोऱ्या उत्तरपत्रिकेचा खेळ? उत्तरं भरण्यासाठी 20 लाखांचा रेट, वाचा कसं चालतं रॅकेट )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com