यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune LPG Gas Cylinder Latest News : अमेरिका-इराण युद्धाचा फटका भारतातील एलपीजीच्या गॅस पुरवठ्याला बसला. त्यानंतर संपूर्ण देशभरात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली होती. परंतु, मागली काही दिवसांपासून कमर्शियल आणि घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. दुसरीकडे गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अशातच पुण्यातील हांडेवाडी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा पुणे काळेपडळ पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपी नितीन हनुमंत होळकरला पोलिसांनी केली अटक
मिळालेल्या माहितीनुसार, हांडेवाडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून 5 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून विक्री सुरु होती. गॅस सिलिंडरची विक्री करणाऱ्या नितीन हनुमंत होळकरला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 103 गॅस सिलेंडरसह चारचाकी गाडी असा एकूण दहा लाख 9 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नक्की वाचा >> CM Devendra Fadnavis: जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; राज्यातील सद्यस्थिती काय? A To Z माहिती वाचा
103 गॅस सिलिंडरच्या टाक्या साठवल्या अन्..
पोलीस आयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काळेपडळ मानसिंग पाटील आणि अमित शेटे यांनी यप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई सुरू असताना 103 गॅस सिलिंडरच्या टाक्या साठवून त्यातून विक्री सुरू होती. एका दुकानांमध्ये मानवी जीवितीस धोका होईल अशा पद्धतीच्या टाक्यांमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस भरून ट्रान्सफर करीत असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी छापेमारी करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नक्की वाचा >> Baramati News: मानवतेला काळीमा फासणारी घटना, मेंढपाळ कुटुंबावर भ्याड हल्ला, 7 नराधमांनी केला विनयभंग
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world