जाहिरात
This Article is From May 21, 2024

पुणे पोलिसांचा अजब कारभार; आरोपी सोडून मृत अनिशच्या भावावरच प्रश्नांचा भडिमार

अनिश आणि अश्विनी दोघेही मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील होते. पुण्यात ते एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होते.

पुणे पोलिसांचा अजब कारभार; आरोपी सोडून मृत अनिशच्या भावावरच प्रश्नांचा भडिमार

पुण्यातील पोर्शे कार अपघातात दोन आयटी इंजिनीअर अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. आरोपी ड्रायव्हरवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांना त्याला रॉयल ट्रिटमेंट दिल्याचा आरोप अनिशच्या कुटुंबीयांनी केला आहे. अनिशचा छोटा भाऊ देवेशने सांगितलं की, येरवडा पोलिसांना आरोपीविरोधात नरमाईची भूमिका घेतली. तर अनिश आणि अश्विनी यांच्यात काय संबंध होते, याबाबत आम्हाला सतत विचारणा करत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देवेशने पुढे सांगितलं की, पोलीस आरोपीची ठेप ठेवताना दिसत होते. अनिशच्या वाढदिवसाची पार्टी कशी झाली, याबाबत त्याच्या मित्रांकडे चौकशी करत होते. अनिशच्या मामांनी सांगितलं की, हा अनुभव खूप वेदनादायी होता. कारण पोलीस अनिशचे मित्र आणि देवेश यांचा वारंवार अपमान करत होते. त्यामुळे पुण्यात शिक्षण घेत असलेल्या देवेशला पुन्हा तिथे पाठवायचं की नाही, या विचारात आम्ही आहोत. 

 नक्की वाचा- 'पोर्शे कारनं ज्याने दोघांना चिरडलं, त्यालाच बर्गर-पिझ्झा दिला'

Pune News

Pune News

अनिश आणि अश्विनी दोघेही मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील होते. पुण्यात ते एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होते. दोघांना आपलं शिक्षणही पुण्यात केलं आहे. अश्विनीने महिनाभरापूर्वीच नोकरी सोडली होती. वडिलांच्या वाढदिवसासाठी ती जबलपूरला जाणार होती, त्यासाठी तिकीटही बुक केलं होतं. 

पोर्शे कारचं रेजिस्ट्रेशनही नव्हतं

आरोपी पोर्शे कार जवळपास 160 किमी प्रतितास वेगाने चालवत होता. आरोपी जी कार चालवत होता तिच रेजिस्ट्रेशनही झालेलं नव्हतं. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीविरोधात ताब्यात घेण्यात आलं अवघ्या 15 तासात त्याची सुटका देखील झाली. मात्र आता आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. 

(नक्की वाचा - रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड)

आरोपीच्या वडिलांना पब मालकाला अटक

पुणे पोलिसांनी आतापर्यंत आरोपीच्या वडिलांना आणि पुण्यातील कोरेगाव पार्क  परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील कोझी बारवर मोठी कारवाई केली आहे. बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com