आई, वडील, भाऊ... रक्तासाठी रात्रभर पळापळ; पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपींचा 'कार'नामा उघड

Pune Porsche Car hit and run case : अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालचे रक्ताचे नमुने घ्यायचे ठरले. मात्र त्याही दारू प्यायल्या होत्या. पण त्यांना दारू घेऊन बराच काळ झाला होता. याच प्रकरणीनंतर शिवानी अगरवालला अटक झाली. 

Advertisement
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील तपासात आणखी एक खुलासा समोर आला आहे. पुणे कार अपघातातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी पालकांना अनेक प्रयत्न केले. यासाठी अगरवाल कुटुंबियांना काय काय केलं, याची माहिती हळूहळू समोर येत आहे. मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तीन जणांच्या रक्ताचे नमुने घेण्याचा प्रयत्न केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अपघातानंतर मुलाच्या रक्ताचे नमुने घेता येणे शक्य नव्हते. कारण मुलगा दारूच्या नशेत होता. त्यावेळी वडील विशाल अगरवाल यांच्या रक्ताचे नमुने देखील घेता आले नाही. कारण तेही दारूच्या नशेत होते. त्यानंतर त्यांना भावाला फोन केला, त्यावेळी त्यानेही दारूही प्यायली.

(नक्की वाचा-  रक्ताच्या नमुन्याची आदला-बदली की अजून काही? पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचा नवा अँगल)

त्यानंतर अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालचे रक्ताचे नमुने घ्यायचे ठरले. मात्र त्याही दारू प्यायल्या होत्या. पण त्यांना दारू घेऊन बराच काळ झाला होता. याच प्रकरणीनंतर शिवानी अगरवालला अटक झाली. 

शिवानी अग्रवालच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यास सांगितलेल्या प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरचे जबाव न्यायालयात सादर करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले. त्याच्या दोन मित्रांच्या बाबतीत, त्यांच्या आईच्या रक्ताचे नमुने देखील पर्याय म्हणून वापरण्याची योजना होती, असे आणखी एका निवासी डॉक्टरने सांगितले. पण असे झाले नाही कारण एका आई आणि मुलाचा रक्तगट समान नव्हता, तर दुसऱ्याच्या आईने 30 मिली अल्कोहोल घेतले होते.

(नक्की वाचा- पुण्यातल्या बिल्डरपुत्रानं 2 महिन्यांनी लिहिला 300 शब्दांचा निबंध)

ससूनमधील 2 डॉक्टर, एक कर्मचारी अटकेत

रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर  या दोघांसह अतुल घटकांबळे कर्मचाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे. याशिवाय मध्यस्थी अश्पाक मकंदर आणि अमर गायकवाय या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.