Pune Weather: पुण्यासाठी आज पावसाचा 'ऑरेंज अलर्ट', नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

Pune Rain News : पुणे शहराला आणि पुणे घाट परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Rain Alert : पुण्यात पहाटेपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. शहरातील अनेक भागांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. काही सखल भागात पाणी साचल्याचंही समोर आलं आहे. बुधवारी देखील पुण्यात हलक्या सरींचा पाऊस होता. मात्र पहाटे पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.  

पुणे शहराला आणि पुणे घाट परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात  नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोथरूड परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. 

(नक्की वाचा-  Rain Alert : राज्यातील या 4 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा; मुंबई-पुण्यात आज पावसाचा काय आहे अंदाज?)

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुले खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणात पाणी साठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे.  खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 7.40 टीएमसी म्हणजे 25.39 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

Advertisement

गतवर्षी याच दिवशी साठा फक्त 3.62 टीएमसी म्हणजे 12.43 टक्के इतका होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

(नक्की वाचा- Raigad News: देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट पर्यटकांसाठी बंद; पोलीस प्रशासनाचे आदेश)

कोणत्या धरणात किती पाणीसाठा? 

  • खडकवासला - .28 टीएमसी
  • पानशेत - 2.16 टीएमसी
  • वरसगाव - 3.67 टीएमसी 
  • टेमघर - 0.29 टीएमसी

Topics mentioned in this article