
Raigad News : रायगड आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले, धबधबे प्रवाहित झाले आहे. त्यामुळे पर्यटक आता अनेक पर्यटनस्थळावर जाण्यास सज्ज झाले आहेत. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रायगड पोलीस प्रशासनाने अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी बंद केली आहेत.
पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हद्दीतील देवकुंड धबधबा व सणसवाडी गावचे हद्दीतील सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाट हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.
सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा 'व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हिणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवित हानी होऊ शकते.
या कारणांमुळे देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाट व आजूबाजूच्या 1 किमी परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार पुढीलबाबींकरिता 17 जून ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीकरिता माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world