जाहिरात

Pune News: ज्या 'फॉर्च्युनर'वर माज केला, तिनेच गोत्यात आणलं; पुण्याच्या रीलस्टारच्या अडचणीत वाढ

रील स्टार प्रतीक शिंदे (वय 24 वर्ष) याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्यात प्रतीक शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: ज्या 'फॉर्च्युनर'वर माज केला, तिनेच गोत्यात आणलं; पुण्याच्या रीलस्टारच्या अडचणीत वाढ
Pune Reel Star Pratik Shinde

Pune News: इंदापूरचा प्रसिद्ध रील स्टार प्रतीक शिंदे सध्या एका मोठ्या अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात खरेदी केलेली त्याची टोयोटा फॉर्च्युनर कारला गुरुवारी सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात झाला. इंदापूर तालुक्यातील भिगवणजवळील मदनवाडी येथे ही घटना घडली असून, या अपघातात एकाच वेळी तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, अकलूज येथील रहिवासी निखिल बाळासाहेब होले (वय 35) हे त्यांच्या हुंडई क्रेटा कारमधून प्रवास करत होते. ते मदनवाडी गावाजवळच्या सकुंडे वस्तीजवळील ऑस्करवाडी मिसळ हॉटेलसमोरून जात असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनर कारने त्यांच्या क्रेटा कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, क्रेटा कार पुढे असलेल्या मारुती वॅगनआर गाडीवर जाऊन आदळली.

Pune Reel Star Pratik Shinde

Pune Reel Star Pratik Shinde

या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रील स्टार प्रतीक शिंदे (वय 24 वर्ष) याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर भिगवण पोलीस ठाण्यात प्रतीक शिंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निखिल होले यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रतीक शिंदेच्या नवीन फॉर्च्युनर कारचा एवढ्या लवकर अपघात झाल्याने सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या अपघातामुळे प्रतीकच्या अडचणीत वाढ झाली आहे.

प्रतीक शिंदेची प्रतिक्रिया

प्रतीक शिंदेने अपघातानंतर बोलताना म्हटलं की, "भावांनो हावयेला अपघात झाला. आता सोशल मीडियावर कुणी म्हणेल प्रतीक शिंदे मेला. मला काही झालं नाही, कुणालाही काही झालं नाही. मी देखील इथेच आहे. पुढच्या 15 दिवसात हे गाडी नीट करून आणणार मी. कुणी बोलल की माज मोडला, मात्र मला माज नव्हता."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com