जाहिरात

Pune News 'काका, मला वाचवा'ची आरोळी घुमणाऱ्या शनिवारवाड्यावर धार्मिक वाद! काय आहे पेशव्यांच्या वाड्याचा इतिहास

Pune Shaniwar Wada: मराठा साम्राज्याच्या वैभवाचं प्रतीक असलेला आणि पुण्याच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक शनिवारवाडा (Shaniwar Wada) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Pune News 'काका, मला वाचवा'ची आरोळी घुमणाऱ्या शनिवारवाड्यावर धार्मिक वाद! काय आहे पेशव्यांच्या वाड्याचा इतिहास
Pune News :  शनिवारवाडा हे पेशवा शासनाचं हे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र होतं.
पुणे:

Pune Shaniwar Wada: मराठा साम्राज्याच्या वैभवाचं प्रतीक असलेला आणि पुण्याच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक शनिवारवाडा (Shaniwar Wada) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक हिंदू संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत वाड्याच्या आवारात विरोध-प्रदर्शन केलं.

गोमूत्र शिंपडून केला विरोध

शनिवारवाड्यामध्ये नमाज अदा करण्याच्या प्रकाराला विरोध करत खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः या ठिकाणी येऊन 'शुद्धीकरण' केलं. त्यांनी गोमूत्र शिंपडून आपला निषेध नोंदवला. कुलकर्णी यांनी म्हटलं की, हिंदू बांधवांनी आणि भगिनींनी केलेल्या शिव वंदनामुळे शनिवारवाड्याचं शुद्धीकरण झालं आहे.

ऐतिहासिक शनिवारवाडा मराठा साम्राज्याच्या सुवर्ण क्षणांचा साक्षीदार आहे. इथे नमाज अदा करण्याची घटना अत्यंत निंदनीय असून पुणे शहराचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी हिंदू संघटनांनी तीव्र विरोध प्रदर्शन केलं

खासदार कुलकर्णी यांनी जोर देत सांगितलं की, "हा शनिवारवाडा अटक ते कटक (Attock to Cuttack) पर्यंत झालेल्या मराठा साम्राज्याच्या विस्ताराचं संचालन केंद्र होतं. हे आपल्या विजयाचं प्रतीक आहे. जर लोक इथे येऊन नमाज अदा करत असतील, तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही."

भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी हिंदूंनी एकत्र येणं आवश्यक आहे. हिंदू संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली इतिहास जपण्याचं आणि त्याचं संरक्षण करण्याचं आपलं कर्तव्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शनिवारवाड्याचा गौरवशाली आणि रक्तरंजित इतिहास


पेशवा बाजीराव प्रथम (Peshwa Bajirao I) यांनी 1732 मध्ये शनिवारवाड्याचं बांधकाम केलं. या वाड्याचा पाया शनिवारी घातला गेला, म्हणूनच याला शनिवारवाडा (Shaniwar Wada) हे नाव मिळालं. हा विशाल वाडा एकेकाळी 13 मजली होता, ज्याला 5 मुख्य दरवाजे आणि 9 बुरुज (Towers) होते. लाकूड आणि दगड वापरून हा वाडा बांधण्यात आला होता.

 शनिवारवाडा हे पेशवा शासनाचं हे राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र होतं, जिथून मराठा साम्राज्याची धोरणं, युद्धनीती आणि मुत्सद्देगिरीचे निर्णय घेतले जात होते.बाजीराव प्रथम, नाना साहेब, माधवराव प्रथम, नारायणराव आणि माधवराव द्वितीय या सर्व पेशव्यांनी याच ठिकाणाहून शासन केलं. सध्या शनिवारवाडा पर्यटन स्थळ असून भारतीय पुरातत्व विभागाच्या (Archaeological Survey of India - ASI) संरक्षणाखाली आहे. इथे दररोज सायंकाळी लाइट अँड साउंड शो (Light and Sound Show) आयोजित केला जातो.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात रातोरात काय घडलं? सारसबाग दिवाळी पहाट कार्यक्रम होणार, आयोजकांचा यू टर्न! )
 

वाड्याला लागलेली आग

1818 मध्ये इंग्रजांनी शनिवारवाड्यावर नियंत्रण मिळवलं. यानंतर 1828 मध्ये वाड्याला भीषण आग लागली, जी अनेक दिवस धुमसत होती. या आगीत वाड्याचा मोठा भाग नष्ट झाला आणि आज केवळ दगडांच्या भिंती आणि दरवाजेच शिल्लक आहेत.

17 वर्षांच्या पेशव्याची हत्या

शनिवारवाड्याचा इतिहास जितका गौरवशाली आहे, तितकाच तो एका रक्तरंजित हत्याकांडानेही गाजला आहे. 1773 मध्ये अवघ्या 17 वर्षांचे असलेले पेशवा नारायणराव (Peshwa Narayanrao) यांची याच वाड्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या कटात त्यांचे काका रघुनाथराव (Raghunathrao) आणि काकी आनंदीबाई (Anandibai) यांचा समावेश होता.

नारायणरावांचे मोठे बंधू माधवराव प्रथम यांच्या निधनानंतर, 1772 मध्ये अवघ्या 16 वर्षांचे असताना नारायणराव पेशवा बनले होते. त्यांना नानासाहेब पेशवा (Nanasaheb Peshwa) म्हणून ओळखले जाणारे बालाजी बाजीराव यांचे ते पुत्र होते.

रघुनाथराव हे गादीचे पुढील दावेदार होते, मात्र नारायणराव पेशवा बनल्याने सत्तासंघर्ष सुरू झाला. नारायणरावांनी आपल्या काकांना नजरकैदेतही ठेवलं होतं. रघुनाथरावांनी नारायणरावांना कैद (धरा) करण्याचा आदेश दिला होता, पण आनंदीबाईंनी पत्रात फेरबदल करून 'धरा' ऐवजी 'मारा' असं लिहिलं, असं म्हटलं जातं. याच आदेशानंतर नारायणराव यांची हत्या झाली. हत्येच्या वेळी नारायणराव "काका, मला वाचवा!" (Kaka, mala wachwa!) अशी किंकाळी फोडत होते.

या हत्याकांडादरम्यान नारायणरावांसह त्यांचे सेवक चापाजी तिलेकर यांच्यासह एकूण 11 लोकांची हत्या झाली होती.

या हत्याकांडामुळे आजही रात्रीच्या वेळी शनिवारवाड्याच्या परिसरात "काका, मला वाचवा!" ही आरोळी ऐकू येते, अशी वदंता आहे. त्यामुळे अनेक लोक या वाड्याला ‘भूताची जागा' (Haunted Place) देखील म्हणतात आणि म्हणूनच रात्रीच्या वेळी इथे लोकांना प्रवेश बंदी आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com