Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू

पुणे आणि शिर्डी दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू व्हावी ही प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. 17 जूनपासून पुणे-साईनगर शिर्डी थेट रेल्वे सेवा नियमितपणे सुरू होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यशपाल सोनकांबळे, पुणे

पुणे ते साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट आणि नियमित रेल्वे सेवा बुधवार,  17 जूनपासून अधिकृतपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर आयोजित विशेष सोहळ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या नवीन रेल्वे सेवेमुळे दरवर्षी शिर्डीला जाणाऱ्या लाखो भाविकांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि कमी खर्चात होणार आहे.

दररोज धावणार रेल्वे

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील शिर्डी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील आणि जगातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. पुणे आणि आसपासच्या परिसरातूनही शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे. मात्र, थेट रेल्वे नसल्याने भाविकांना बस किंवा खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते.

Advertisement

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये

यापूर्वी पुण्यातून शिर्डीसाठी थेट आणि नियमित ट्रेन उपलब्ध नव्हती. या नव्या सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
ही ट्रेन दररोज धावणार असल्याने भाविकांना आपल्या वेळेनुसार कधीही प्रवासाचे नियोजन करता येईल.
या रेल्वेमुळे केवळ पुणे आणि शिर्डीच जोडले जाणार नाहीत, तर या मार्गावरील इतर लहान स्थानकांना आणि प्रादेशिक संपर्काला मोठी चालना मिळणार आहे.

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)

प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता

17 जून रोजी होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापारी आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.

थेट रेल्वे सुरू होत असल्याने पहिल्याच दिवसापासून या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या ट्रेनचे सविस्तर वेळापत्रक आणि तिकीट बुकिंगची माहिती लवकरच आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world