
पर्यटकांनो, सिंहगडावर जाण्याचा प्लान करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे निसर्गही बहरला आहे. घाट आणि किल्ले परिसरात धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे. अशा वातावरणात पर्यटकांना गड-किल्ल्याचे वेध लागतात. त्यातही पुण्यातील सिंहगडावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
दरम्यान आज गुरुवारी सिंहगडावर जाण्याचा प्लान करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पर्यटकांसाठी आज सिंहगड किल्ला बंद राहणार आहे. आज एक दिवस सिंहगड बंद राहणार असल्याचा वन विभागाचा आदेश आहे. आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने किल्ला बंद ठेवण्यात आला आहे.
नक्की वाचा - Monsoon 2025 : हवामान विभागाकडून मान्सूनबाबत 5 Good News, शेतकऱ्यांसाठीही चांगली बातमी
पुढील काही दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सिंहगड किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि आज आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली असून कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी प्रवेश करण्यासही बंदी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world