
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाच्या नैऋत्य मान्सूनबद्दल पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती दिली आहे. IMD ने मंगळवारी सांगितले की, यावर्षी देशात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडेल. देशाच्या बहुतांश भागांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी संपूर्ण देशात नैऋत्य मान्सूनचा हंगामी (जून ते सप्टेंबर 2025) पाऊस दीर्घकाळच्या सरासरी (LPA) च्या 106 टक्के पर्यंत असण्याची शक्यता आहे, ज्यात मॉडेल त्रुटी ± ४ टक्के असेल, असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
IMD नं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल. 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी 87 सें.मी. पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. IMD ने स्पष्टपणे सांगितले आहे की, यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा जास्त राहील. तसेच, संपूर्ण देशात जून महिन्यात 87 सें.मी. पर्यंत पाऊस पडेल असेही त्यांनी म्हटले आहे.
IMD नुसार, जून ते सप्टेंबर 2025 पर्यंत देशभरात होणारी हंगामी पाऊस दीर्घकाळच्या सरासरी (LPA) च्या 106 टक्के पर्यंत राहील. हे 2025 च्या मान्सून हंगामात संपूर्ण देशात सामान्यापेक्षा जास्त पावसाचे संकेत आहे.
( नक्की वाचा : EXPLAINER : मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? वाचा A to Z माहिती )
ईशान्य भारतात पावसाची स्थिती
मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात सामान्यापेक्षा जास्त पाऊस म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस होईल. याव्यतिरिक्त, वायव्य भारतात सामान्य पाऊस म्हणजेच 92 ते 108 टक्के पाऊस अपेक्षित आहे. तर, ईशान्य भारतात सामान्यापेक्षा कमी पाऊस म्हणजेच 94 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
कृषी क्षेत्राला फायदा
हवामान विभागाने माहिती दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोअर झोन (MCZ), ज्यात भारतातील बहुतेक पावसावर आधारित कृषी क्षेत्रांचा समावेश आहे, तिथे सामान्यापेक्षा जास्त म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये 108 टक्के पाऊस
देशाच्या वायव्य आणि पूर्व भारतातील काही भाग तसेच ईशान्य भारतातील अनेक प्रदेश वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. जून 2025 मध्ये देशासाठी सरासरी पाऊस सामान्यपेक्षा जास्त म्हणजेच LPA च्या १०८ टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. द्वीपकल्पातील काही दक्षिणी भाग आणि वायव्य व ईशान्य भारतातील काही भागांना वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त पावसाचा अंदाज IMD ने लावला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, यावर्षी नैऋत्य मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Above Normal Rainfall/106% of Long Period Average) चा अंदाज आम्ही जारी केला आहे. ही शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे, कारण मान्सून कोअर झोनमध्ये (ज्यात देशातील बहुतेक पावसावर आधारित कृषी क्षेत्रांचा समावेश आहे) सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. तसेच, जून महिन्यात आम्ही सरासरीपेक्षा 108% जास्त पावसाचा अंदाज जारी केला आहे. जून महिन्यातच शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीची प्रक्रिया सुरू करतात. जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यांनी सांगितले की, जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, जास्त पावसामुळे दिवसा आर्द्रता जास्त असेल आणि लोकांना जास्त उष्णता जाणवेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world