जाहिरात

Pune Railway: पुणेकरांचा लोकल रेल्वे प्रवास होणार सुसाट; 60 नवीन गाड्यांसह 6 प्लॅटफॉर्म मिळणार, काय आहे प्लॅन

पुणे रेल्वे विभागाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे उपनगरीय प्रवाशांच्या प्रवासाचे चित्र बदलणार असून, लवकरच या कामांना गती मिळणार आहे.

Pune Railway: पुणेकरांचा लोकल रेल्वे प्रवास होणार सुसाट;  60 नवीन गाड्यांसह 6 प्लॅटफॉर्म मिळणार, काय आहे प्लॅन

Pune Railway: पुणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा चेहरामोहरा बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एका मोठ्या विस्तारीकरण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत 60 नवीन उपनगरीय गाड्या सुरू करण्यात येणार असून, विविध स्थानकांवर सहा नवीन प्लॅटफॉर्मची भर पडणार आहे. यामुळे पुणे आणि परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.

पुणे रेल्वे विभागाने उपनगरीय रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची आखणी केली आहे. या विस्तारामुळे केवळ गाड्यांची संख्या वाढणार नाही, तर वेळेची बचत होऊन रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

प्रवासी क्षमतेत मोठी वाढ

पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते हेमंत कुमार बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दररोज 110 उपनगरीय गाड्या चालवल्या जातात. विस्तारीकरणानंतर ही संख्या 180 पर्यंत पोहोचणार आहे. पुणे-दौंड मार्गागवर सध्याच्या 75 सेवांवरून ही संख्या 125 पर्यंत वाढवण्यात येईल. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सुमारे 3 लाख प्रवाशांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या सध्या 5 आहे, ती भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढणार असून एकूण 280 गाड्यांपैकी 110 गाड्या पुण्यातूनच मार्गस्थ होतील.

(नक्की वाचा- Dhule Crime: लाठ्याकाठ्या तलवारीने हल्ला, गोळीबार... शीख बांधवांमध्ये तुफान राडा, धुळ्यात खळबळ)

स्थानकांचा कायापालट होणार

पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक स्थानकांवर नवीन प्लॅटफॉर्म आणि कोचिंग टर्मिनलची उभारणी केली जाणार आहे:

  • हडपसर- 3 प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येईल.
  • खडकी - प्लॅटफॉर्मची लांबी 3 ते 4 कोचने वाढवली जाईल.
  • आळंदी - नवीन कोचिंग टर्मिनल, अतिरिक्त पिट लाईन्स आणि स्टॅबलिंग सुविधा.
  • उरुळी (कांचन) - 10 प्लॅटफॉर्म (5 स्थानिक प्लॅटफॉर्मसह), 2 पिट लाईन्स आणि स्टॅबलिंग व्यवस्था.
  • फुरसुंगी - उपनगरीय गाड्यांसाठी 5 नवीन स्टॅबलिंग फॅसिलिटीज. |

विस्तारीकरणाचे फायदे

  • वक्तशीरपणा: गाड्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वेळापत्रक पाळणे सोपे होईल.
  • गर्दीवर नियंत्रण: जास्तीच्या गाड्यांमुळे डब्यांमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल.
  • पुण्याची वाहतूक कोंडी: रेल्वे सेवा सुधारल्यामुळे नागरिक खासगी वाहनांऐवजी रेल्वेला पसंती देतील, परिणामी शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल.
  • सुरक्षित प्रवास: नवीन प्लॅटफॉर्म आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांची सुरक्षा वाढेल.

पुणे रेल्वे विभागाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे उपनगरीय प्रवाशांच्या प्रवासाचे चित्र बदलणार असून, लवकरच या कामांना गती मिळणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com