
Mahashivratri Pune Traffic : आज महाशिवरात्रीनिमित्त देशभरात भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात पहाटे पासून भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच 3-4 किलोमीटर लांब रांगा लागल्या असून भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पुण्यातही भाविकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील काही रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पुण्यातील पुण्येश्वर रस्ता ते अगरवाल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शहर वाहतूक शाखेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नक्की वाचा - Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खाणे टाळा! आरोग्य प्रशासनाची गंभीर सूचना, कारण काय?
पर्यायी मार्ग कोणते?
कुंभारवेस चौकातून फडके हौद चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी कुंभारवेस चौक -गाडगीळ पुतळा चौक- जिजामाता चौक - गणेश रस्त्याने इच्छित स्थळी जावे
सूर्या हॉस्पिटलकडून पवळे चौकातून अगरवाल रस्त्याने जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने जिजामाता चौकातून डावीकडून गणेश रस्त्याने पुढे जावे
फडके हौद चौकातून कुंभारवेस चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जिजामाता चौक- फुटका बुरूज - बाजीराव रस्ता- गाडगीळ पुतळा मार्गे इच्छित स्थळी जावे
कमला नेहरू रुग्णालयाकडून अगरवाल रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना दारूवाला पूल -देवजीबाबा चौक -फडके हौद चौकमार्गे पुढे इच्छित स्थळी जाता येईल
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world