जाहिरात

Pune Traffic : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, 31 डिसेंबरला घराबाहेर पडताना जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

पुण्यातील या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल होणार असून उद्या 31 डिसेंबरपासून नवे नियम लागू होतील. 

Pune Traffic : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, 31 डिसेंबरला घराबाहेर पडताना जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

पुणे शहरात 31 डिसेंबरची मोठी तयारी सुरू आहे. पुण्यात दरवर्षी देशभरातून मोठा तरुणवर्ग शिक्षणासाठी येत असतो. त्यामुळे पुण्यात 31 डिसेंबरच्या रात्री वेगळाच माहोल पाहायला मिळतो. दरम्यान नववर्षात गर्दी लक्षात घेता पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातल्या मुख्य रस्त्यांवर मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यातील ज्या परिसरात प्रामुख्याने पब्स आणि क्लब्स आहेत तेथे अशा काळात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. 31 डिसेंबरला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहर वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. उद्या 31 डिसेंबरला सायंकाळनंतर वाहतुकीत बदल होणार आहेत. 

New Year Celebration : नववर्षाच्या पार्टीमध्ये पबकडून कंडोम आणि ORS चं पाकिट भेट, पुण्यातील 'त्या' पबचा अजब दावा

नक्की वाचा - New Year Celebration : नववर्षाच्या पार्टीमध्ये पबकडून कंडोम आणि ORS चं पाकिट भेट, पुण्यातील 'त्या' पबचा अजब दावा

पुण्यातील या रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल 

कॅम्प परिसर 
बदल: MG रोडवर येणाऱ्या वाहनांना पूर्णपणे बंदी 

बदल: इस्कॉन मंदिर चौकाकडून आंबेडकर पुतळा आणि अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहणार 

पर्यायी मार्ग : 15 ऑगस्ट चौकातून वाहतूक वळवण्यात येणार 

डेक्कन परिसर 

बदल : फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार 

पर्यायी मार्ग: प्रभात रोड, अलका टॉकीज रोड आणि लॉ कॉलेज रोडकडे वाहतूक वळवण्यात येणार 

फर्ग्युसन कॉलेज रोड आणि कॅम्प परिसरातील MG रोड No Vehicle Zone
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com