पुण्याला समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडणार, पुणे-शिरूर महामार्गाला राज्य सरकारची मंजुरी

Samruddhi Mahamarg : पुण्याला समृ्द्धी महामार्गाशी जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 53 किमीच्या सहा पदरी पुणे-शिरूर उन्नत महामार्गाला मंजुरी दिली आहे. हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरमार्गे बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. 

Advertisement
Read Time: 1 min

राहुल कुलकर्णी, पुणे

मुंबई आणि नागपूर शहरांचे अंतर दूर करणार समृद्धी महामार्ग अनेक जिल्ह्यांसाठी वरदान ठरला आहे. मात्र आता पुण्याला देखील समृद्धी महामार्गाला जोडण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. पुण्याला समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. 

पुण्याला समृ्द्धी महामार्गाशी जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 53 किमीच्या सहा पदरी पुणे-शिरूर उन्नत महामार्गाला मंजुरी दिली आहे. हा महामार्ग छत्रपती संभाजीनगरमार्गे बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. 

(नक्की वाचा -  Pune Hit and Run : पुण्यात आणखी एक हिट अँड रन; मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू)

नवा महामार्ग वाघोली आणि लोणीकंदजवळील केसनांद येथून सुरू होऊन छत्रपती संभाजीनगरमधून जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) सहाय्याने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) द्वारे केला जाईल.

(नक्की वाचा - Amit Shah : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग; अमित शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर खलबतं)

सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 7 हजार 515 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे पुणे आणि आजूबाजूचा परिसर समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे.