जाहिरात

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेच्या अनधिकृत बांधकामावर चालवला जेसीबी; वैशालीवरही कारवाई

गुडलक कॅफे आणि वैशाली ही पुण्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे.

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेच्या अनधिकृत बांधकामावर चालवला जेसीबी; वैशालीवरही कारवाई

पुण्यातील प्रसिद्ध गुडकल कॅफे आणि वैशालीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेकडून गुडलक कॅफेवरील अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. यादरम्यान गुडलक कॅफेजवळ मोठी गर्दी जमा झाली होती.  गुडलक कॅफे हे पुण्यातील प्रसिद्ध कॅफेंपैकी एक आहे. या कॅफेत तरुणवर्गाचा मोठा राप्ता असतो. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने गुडलक कॅफेमध्ये येत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, गुडलक कॅफेचा अर्धा भाग अनधिकृत असल्याने महापालिकेने हातोडा चालवला. गुडलक कॅफेला अर्धा भाग तोडण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

पुणे मनपाकडून फर्ग्युसन रस्ता, जेएम आणि डेक्कन परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अनधिकृत ठिकाणांवर मनपाने जेसीबी फिरवला आहे. आज पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर कारवाई करण्यात आली असून त्यापाठोपाठ वैशाली रेस्टॉरंटवरही कारवाई करण्यात आली आहे. वैशाली रेस्टॉरंटचा बाहेरील परिसर अनधिकृत असल्याने पालिकेने जेसीबी चालवला आहे. 

Pune News : पुणे विमानतळावरुन 'या' 5 शहरांसांठीची उड्डाणं रद्द, कधीपासून होणार सुरू?

नक्की वाचा - Pune News : पुणे विमानतळावरुन 'या' 5 शहरांसांठीची उड्डाणं रद्द, कधीपासून होणार सुरू?

    गुडलक कॅफेचा बाहेरील भाग, जिथं टेबल लावण्यात आली आहेत, तसंच पत्रे लावलेली रचना अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. कॅफेकडून साइड मार्जिनच्या नियमांचंही उल्लंघन करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती आहे.   


     

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    Listen to the latest songs, only on JioSaavn.com