Pune News: मोबाईल लोकेशन अन् लाल कपडे...आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा पुणे पोलिसांनी वाचवला असा जीव!

Pune Police Suicide Rescue:  पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका 39 वर्षांच्या व्यक्तीला आत्महत्येपासून वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Police : या कामगिरीबद्दल पोलीस मार्शलचे कौतुक होत आहे. ( प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी 

Pune News:  पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका 39 वर्षांच्या व्यक्तीला आत्महत्येपासून वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलण्यासाठी निघालेल्या या व्यक्तीला नांदेड सिटी मार्शलच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले. लोहगाव पोलीस ठाणे आणि नांदेड सिटी पोलीस यांच्यातील योग्य समन्वयामुळे हा थरार सुखरूप संपला.

काय आहे प्रकरण?

शिवणे परिसरात राहणारे प्रदीप दीपकराव चंदनशिव (वय 39) हे घरगुती त्रासाला कंटाळून टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत होते. या घटनेची माहिती मिळताच लोहगाव पोलीस ठाण्याने तातडीने हालचाली केल्या. त्यांनी तांत्रिक मदतीने संबंधित व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक केले आणि ही माहिती सिंहगड रोडवरील नांदेड सिटी मार्शल पोलीस खराडे आणि होमगार्ड राऊत यांना कळवली. माहिती मिळताच पोलिसांनी कोणताही वेळ न घालवता त्या दिशेने धाव घेतली.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News: मंचरमध्ये पुन्हा धार्मिक वादाची ठिणगी! मशिदीखाली भुयार सापडल्याच्या चर्चेनंतर आता बारवेवर रणकंदन )

शेतकऱ्यांची मदत आणि थरारक पाठलाग

पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, मात्र ते सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होते.  त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. घटनास्थळी पोहोचल्यावर सुरुवातीला ती व्यक्ती कोठेही दिसून आली नाही. मात्र, तिथे शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. 

एका लाल कपड्यांमधील व्यक्तीने त्याचे चारचाकी वाहन एका ठराविक दिशेला नेल्याचे त्यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला आणि शेवटी वर्णनाप्रमाणे त्या व्यक्तीला शोधून काढले.

( नक्की वाचा : Pune News पुणे ते संभाजीनगर आता फक्त सव्वा दोन तासात! नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक, 5 बड्या प्रकल्पांना मंजुरी )

पोलिस स्टेशनमध्ये समुपदेशन आणि सुटका

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीने घरगुती त्रासामुळे आपण हे पाऊल उचलण्यास निघाल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सुरक्षितपणे नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे आणले. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून त्यांनाही पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून, या कामगिरीबद्दल पोलीस मार्शलचे कौतुक होत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया

लोहगाव पोलिसांकडून माहिती मिळताच आमच्या मार्शलनी तत्परतेने काम केले. वेळेत लोकेशन ट्रॅक झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या मदतीमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचवता आले, अशी प्रतिक्रिया नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.
 

Advertisement

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Topics mentioned in this article