जाहिरात

Symbiosis Ragging : सिम्बॉयसिस विद्यापीठात रॅगिंग? पुण्यातून थेट हरियाणात फोन, मध्यरात्री काय झालं?

शिवाय झालेल्या प्रकाराची तातडीने विद्यापीठ प्रशासनाला ईमेल द्वारे माहिती दिली. दरम्यान या विद्यार्थ्याचे रॅगिंग झाले त्यावेळी एका विद्यार्थ्याने त्याचा व्हिडीओ ही काढला.

Symbiosis Ragging : सिम्बॉयसिस विद्यापीठात रॅगिंग? पुण्यातून थेट हरियाणात फोन, मध्यरात्री काय झालं?
पुणे:

सिम्बॉयसिस लॉ स्कूल हे पुण्याती एक प्रतिष्टीत शिक्षण देणारी संस्था म्हणून पाहिली जाते. मात्र इथं एका विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याची घटना समोर आली आहे. तशी तक्रार पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी दिली आहे. ही घटना बुधवारी 27 मार्च 2025  रोजी रात्री 12 वाजता घडली. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या  मुलांच्या वसतिगृहात ही घटना घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार ही दाखल केली आहे. या घटनेनंतर विद्यापाठीत एकच खळबळ उडाली आहे. रॅगिंगचा व्हिडीओ ही काढला गेल्याचे समोर आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्या विद्यार्थ्याचं रॅगिंग करण्यात आलं, तो सिम्बायोसिस लॉ स्कूलमध्ये प्रथम वर्ष बी.बी.ए.एल.एल.बी. मध्ये शिकतो. तो वसतिगृहातील खोली क्रमांक 606  मध्ये राहतो. बुधवारी रात्री 12 वाजता 8 ते 10 विद्यार्थ्यांनी मिळून संबंधीत विद्यार्थ्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला. शिवाय त्याला शिवीगाळ करण्यात आली असं विद्यार्थ्याच्या वडीलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेनंतर तो विद्यार्थी घाबरलाहोता. त्याने रात्री साडेबारा वाजता आपल्या वडीलांना याबाबत फोन केला होता. त्याचे वडील त्यावेळी फरीदाबाद हरियाणा इथं होतं. मुलाची अवस्था पासून त्यांनी त्याच वेळी थेट हरियाणातून पुणे गाठले. 

ट्रेंडिंग बातमी - Shocking news : प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल, 14 मिनिटांच्या 'त्या' व्हिडीओत काय?

शिवाय झालेल्या प्रकाराची तातडीने विद्यापीठ प्रशासनाला ईमेल द्वारे माहिती दिली. दरम्यान या विद्यार्थ्याचे रॅगिंग झाले त्यावेळी एका विद्यार्थ्याने त्याचा व्हिडीओ ही काढला. तो व्हिडीओ ही त्या मुलाच्या वडीलांनी पाहीला आहे. त्यात त्यांच्या मुला बरोबर काही मुलं गैरवर्तन करत असल्याचे दिसत आहेत. वसतिगृह अधिक्षकांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही हा प्रथमदर्शनी रॅगिंगचा प्रकार असल्याचं मान्य केल्याचा दावा पीडित विद्यार्थ्याच्या वडीलांनी केला आहे. या घटनेची माहिती कॉलेज प्रशासन आणि संबंधित विभागाला देणार असल्याचे ही अधिक्षकांनी स्पष्ट केले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news: गर्लफ्रेंडवर 6 वेळा अत्याचार, वॉशिंग मशीनमुळे बॉयफ्रेंड गजाआड, नेमकं काय घडलं?

दरम्यान त्या विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्यानंतर  रात्री पावणे दोन वाजता त्याने पोलिसांनाही फोन केला होता. शिवाय मदतीची मागणी ही केली होती. हा फोन 112 या क्रमांकावर करण्यात आला होता. पण पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप पीडित विद्यार्थ्याच्या वडीलांनी केला आहे. शिवाय सकाळी येवून तक्रार दे असा सल्ला त्या विद्यार्थ्याला देण्यात आला होता असं तक्रारीत म्हटलं आहे. ज्या मुलांनी रॅगिंग केले ते नशेत होते. त्यांनी केलेल्या मारहाणीत पीडित मुलाला जखमा ही झालेल्या आहेत. पीडित मुलाच्या वडीलांनी पोलिसातही तक्रार दिली असून एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.