Guardian Minister : शिवसैनिकांच्या आंदोलनाला यश; 2 पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

भाजप नेते गिरीश महाजन यांची नाशिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins

राज्यातील पालकमंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन ठिकाणी या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहेत. रायगड आणि नाशिकच्य पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली आहे.  दोन्ही ठिकाणी पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवरुन शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली होती. रायगडमध्ये तर भरत गोगावले समर्थक रस्त्यावर उतरले होते. या दबावानंतर हा निर्णय मागे घेतल्याची चर्चा आहे. 

भाजप नेते गिरीश महाजन यांची नाशिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड करण्यात आली होती. मात्र नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याची शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांची पत्राद्वारे माहिती दिली आहे. 

(नक्की वाचा-  Guardian Minister: पालकमंत्र्यांना काय अधिकार असतात? इतकं महत्त्वाचं का असतं हे पद?)

भरत गोगावले समर्थकांचा राडा

पालकमंत्रिपदांची यादी जाहीर झाल्यानंतर महाडमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते.  रात्री उशीरा शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर उतरुन महामार्ग रोखला. महाड तालुक्यातील नांगलवाडी हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून शिवसैनिकांनी निदर्शने केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांचा जयजयकार करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी देखील या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केली होती. भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी मागणी देखील उदय सामंत यांनी केली होती. 

Advertisement

(नक्की वाचा - मुंडेंना धक्का, तटकरेंना बळ... पालकमंत्र्यांच्या यादीतून मुख्यमंत्र्यांनी काय दिले महत्त्वाचे संदेश?)

पालकमंत्र्यांची यादी 

  • गडचिरोली          देवेंद्र फडणवीस 
  • ठाणे                   एकनाथ शिंदे 
  • मुंबई शहर           एकनाथ शिंदे 
  • पुणे                     अजित पवार 
  • बीड                    अजित पवार 
  • नागपूर                 चंद्रशेखर बावनकुळे 
  • अमरावती             चंद्रशेखर बावनकुळे 
  • अहिल्यानगर          राधाकृष्ण विखे पाटील 
  • वाशिम                  हसन मुश्रीफ 
  • सांगली                  चंद्रकांत  पाटील 
  • नाशिक                 गिरीश महाजन 
  • पालघर                  गणेश नाईक 
  • जळगाव                 गुलाबराव पाटील 
  • यवतमाळ               संजय राठोड 
  • मुंबई उपनगर         आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा 
  • रत्नागिरी                 उदय सामंत 
  • धुळे                       जयकुमार रावल 
  • जालना                   पंकजा मुंडे 
  • नांदेड                     अतूल सावे 
  • चंद्रपूर                    अशोक उईके 
  • सातारा          शंभूराज देसाई
  • रायगड         आदिती तटकरे
  • लातूर          शिवेंद्रसिंहराजे भोसले
  • नंदूरबार        माणिकराव कोकाटे
  • सोलापूर        जयकुमार गोरे
  • हिंगोली        नरहरी झिरवाळ
  • भंडारा        संजय सावकारे
  • छत्रपती संभाजीनगर  संजय शिरसाट
  • धाराशिव       प्रताप सरनाईक
  • बुलडाणा       मकरंद जाधव (पाटील)
  • सिंधुदुर्ग       नितेश राणे
  • अकोला      आकाश फुंडकर
  • गोंदिया      बाबासाहेब पाटील 
  • कोल्हापूर     प्रकाश आबिटकर
  • कोल्हापूर    माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
  • गडचिरोली   आशिष जयस्वाल (सह -पालकमंत्री)
  • वर्धा        पंकज भोयर
  • परभणी     मेघना बोर्डीकर
Topics mentioned in this article