Rain Alert : मुंबईत पुढील 3-4 तास जोरदार पावसाची शक्यता, रत्नागिरी-सिंधुदुर्गात रेड अलर्ट

Maharashtra Weather Update : ठाण्यात आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मागील दोन दिवसांपासून मुंबई पावसाची संततधार सुरु आहे. आज देखील मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर दिसत आहे. पुढील 3-4 तास हा जोर कायम राहिल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मुसळधार पावसाने सी-लिंक परिसरात दृश्यमानता देखील घटली आहे. पुढील 48 तास मुंबईत चांगला पाऊस अपेक्षित आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाण्यात आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मागील २४ तासात ठाणे शहरात 120 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.  

(नक्की वाचा- ...तर विधानसभा निवडणूक लढणार नाही, महायुतीसाठी जागा सोडेन; आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान)

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट

कोकणात देखील पावसाचा जोर कायम आहे. कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर  रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. 

Advertisement

पालघरमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.  दरम्यान, दुपारी 12 वाजेनंतर पुन्हा एकदा अलर्टमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा - 'आजची रात्र तुमच्या हातात, 9 मागण्या मान्य करा, अन्यथा...' मनोज जरांगेंचा सरकारला फायनल इशारा)

विदर्भात यलो अलर्ट

विदर्भात आज सर्वत्र ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांचा येलो अलर्ट  देण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात जवळपास सर्वत्र मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 

Advertisement

Topics mentioned in this article