'19 तारखेला सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देणार आहे. त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईल' अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली. ते अमरावतीतून बोलत होते. मी निवडणुकीतून माघार घेऊन माझी जागा महायुतीला देईल असल्याचं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या घोषणेनंतर एकच चर्चा सुरू झाली आहे.
आमची तिसरी आघाडी नाही तर आम्ही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची पहिली आघाडी तयार करू असा विश्वास कडूंनी व्यक्त केला. मी महायुतीत नसल्याचं म्हटलं जातं, परंतू मी महायुतीमध्येच असल्याचं स्पष्टीकरण यावेळी त्यांनी केलं.
नक्की वाचा - 'आजची रात्र तुमच्या हातात, 9 मागण्या मान्य करा, अन्यथा...' मनोज जरांगेंचा सरकारला फायनल इशारा
शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या...
बच्चू कडू यांनी सरकारकडे शेतकरी, कष्टकरी यांच्यासह दिव्यांगांसाठी काही महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत. सरकारने या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
काय आहेत मागण्या...?
- पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीमधून करावी.
- 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा
- दिव्यांगाना 6 हजार रूपये प्रति महिना मदत द्यावी
- गरीब व श्रीमंतांमधील विषमता वाढत चालली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world