Vasai News : इमारतीचा सज्जा अचानक कोसळला; रस्त्याला समुद्राचं रुप; वसईतील अंगावर काटा आणणारी दृश्यं

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वसईत इमारतींच्या दुर्घटनांची मालिका सुरूच आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Vasai News : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वसईत इमारतींच्या दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास वसई पश्चिमेतील अग्रवाल परिसरातील गोम्स गार्डन या नऊ मजली इमारतीच्या रिफ्यूजी एरियाचा सज्जा अचानक कोसळला. या दुर्घटनेत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सहा दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवाने त्यावेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

विशेष म्हणजे याच दिवशी दुपारी गोखीवरे येथील वंडर पार्क इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ दुचाकींचे नुकसान झाले होते. त्यानंतर काही तासांतच दुसरी दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Advertisement

नक्की वाचा - मुंबईसह 'या' जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचे संकेत?

रस्ता आहे की ‘समुद्र', नागरिकांना पडला प्रश्न..

मुसळधार पावसानंतर वसईतील वसंतनगरी रोड रविवारी सायंकाळच्या सुमारास पूर्ण जलमय झाला. रस्त्यावर इतके पाणी साचले की शेजारील मोकळा प्लॉट आणि रस्ता यातील फरकच नाहीसा झाला असून संपूर्ण परिसराला जणू समुद्राचे स्वरूप प्राप्त झाले. एका बाजूला पूरस्थितीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असताना, रविवारची सुट्टी असल्याने अनेक नागरिकांनी कुटुंबीय आणि लहान मुलांसह या परिसरात फेरफटका मारत पावसाचा मनमुराद आनंद लुटला. पूरासारखी परिस्थिती आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद अशा दोन विरुद्ध चित्रांचा अनोखा संगम वसंतनगरीत पाहायला मिळाला

Topics mentioned in this article