
RRaj Thackeray and dada bhuse Meeting : हिंदी भाषेच्या सक्तीकरणासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. म्हणजेच आजच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाले दादा भुसे?
शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेच्या समावेशाबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. माझ्याबरोबर शिक्षण विभागातील अधिकारीही होते. तिसऱ्या भाषेचा समावेश आवश्यक का आहे? हे आम्ही राज ठाकरे यांच्यासमोर ठेवले. त्यांना आमची भूमिका मान्य नाही असं दिसतं आहे.
राज ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहेचवणार आहे. अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या समावेशा संदर्भात नकारात्मक भूमिका राज ठाकरे यांची आहे. कला, क्रीडा विषयांचा अभ्यासक्रमातील गुणांकनासाठी समावेश असावा, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली आहे, असंही दादा भुसे यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world