Raj-Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधू आज एकाच मंचावर; विजयी मेळाव्यात कोणते नेते भाषण करणार?

Uddhav Thackeray Raj Thackeray Meet: वरळी डोमच्या आत आणि बाहेर येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेते मंडळींची भाषणे ऐकण्यासाठी एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक बंद असणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. ठाकरे बंधूंच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला. या यशाचा विजयी सोहळा आज वरळी डोम येथे साजरा करणार आहे.  यानिमित्तीने आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. शिवसेना-मनसे सोबतच अनेक राजकीय  पक्ष या विजयी सोहळ्यात सामील होणार आहेत. 

(ट्रेंडिंग बातमी - Sushil Kedia: 'मी प्रतिज्ञा करतो मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते कर, ठाकरेंना भिडणारा तो उद्योजक कोण?)

आज सकाळी ११.३० वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठी प्रेमी या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. वरळी डोमची बसायची क्षमता 7 ते 8 हजार इतकी आहे. मात्र ठाकरे बंधूंची भाषणे ऐकण्यासाठी मोठी गर्दी होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने वरळी डोम या ठिकाणी जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.  

यासाठी वरळी डोमच्या आत आणि बाहेर येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेते मंडळींची भाषणे ऐकण्यासाठी एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत. डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक बंद असणार आहे. 

(नक्की वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदें म्हणाले 'जय गुजरात', अजित पवारांनी वाजवल्या टाळ्या! पाहा Video )

कोणत्या नेत्यांची भाषणे होणार? 

आजच्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष) या नेत्यांची भाषणे होणार आहेत. काँग्रेसचा कुणी नेता या मेळाव्याला हजर राहणार की नाही अद्याप स्पष्ट नाही. मात्र काँग्रेसकडून जर कुणी आलं तर त्यांना ऐनवेळी भाषणाला संधी दिली जाईल. शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असणार आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article