
Eknath Shinde Jai Gujarat slogan : राज्यातील सर्व नागरिकांनी मराठी बोललं पाहिजे यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष आक्रमक झाले आहेत. मुंबईतील मीरारोडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. हा विषय तापलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात 'जय गुजरात' अशी घोषणा दिल्यानं नवीन चर्चा सुरु झाली आहे.
पुण्यातील गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात' अशी घोषणा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' अशी घोषणा करताच अजित पवार यांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.
पहिलीपासून हिंदीची सक्तीचा मुद्दा राज्यात गेल्या आठवड्यात चांगलाच तापला होता. त्यानंतर राज्य सरकारनं तो जीआर रद्द केला. या विषयावर उद्धव आणि राज ठाकरे या बंधुंचा विजय मेळावा मुंबईतल्या वरळीमध्ये शनिवारी (5 जुलेै) होत आहे. त्यापूर्वीच शिंदे यांनी 'जय गुजरात' अशी घोषणा केल्यानं वाद तापण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले )
विरोधकांनी या विषयावर शिंदे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना खुश करण्यासाठी या प्रकारची घोषणा करत आहेत, असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. तर, या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना केली. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'विनाशकाले विपरित बुद्धी' अशी टीका केली आहे.
मुंबईतील एका गुंतवणुकदाराचं राज ठाकरेंना आव्हान
दरम्यान, मुंबईतील एक गुंतवणुकदारानं ट्वीट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली आहे. त्यांनी 'काय करायचं आहे ते कर' असा एकेरी उल्लेख करत थेट राज ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. सुशील केडीया असं या गुंतणुकदाराचं नाव आहे. गेल्या 30 वर्षापासून ते मुंबईत आपला व्यावसाय करतात. त्यांनी मराठीबाबत एक ट्वीट करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world