BMC Job : मुंबई महापालिकेत मेगा भरती, परीक्षेची तारीखही झाली जाहीर

BMC Job : राज्यातील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठी भरती होणार आहे. एकूण 1846 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दिनांक 2 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान तसेच दिनांक 11 आणि 12 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा होणार आहे. 

राज्यातील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावेत आणि वेळापत्रकानुसार  संबंधित केंद्रावर निश्वित वेळेत उपस्थित राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. 

(नक्की वाचा-  मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांच्या खेळीने शिंदे बॅकफूटवर)

‘कार्यकारी सहायक' (लिपिक) या पदासाठी 1 हजार 846 रिक्त पदांसाठी भरती असणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्टपासून दिनांक 9 सप्टेंबर 2024 दरम्यान तसेच सुधारित जाहिरातीनुसार, दिनांक 21 सप्टेंबर 2024 पासून दिनांक 11 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. 

उमेदवारांसाठी 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान तसेच 11 डिसेंबर 2024 आणि 12 डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीदरम्यान रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. याठिकाणी उमेदवाराने केलेल्या   अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करता येईल. लॉगिन केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. 

Advertisement

(नक्की वाचा - VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला)

प्रवेश पत्रावर उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी. दरम्यान, उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी 9513253233 हा हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येत आहे.

Topics mentioned in this article