Pune News: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं, महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय

Pune News : वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी तसेच पुणे जिल्हा परिषदेने याआधीच नाव बदलाचा ठराव मंजूर केला होता. त्याला आता महसूल विभागाने मान्यता दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Pune News : जिल्हे, तालुका, शहरांची नावे बदलण्याच्या यादीत पुण्यातील एका तालुक्याचा समावेश झाला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदलण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने घेतला आहे. वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड' करण्याच्या ठरावाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी तसेच पुणे जिल्हा परिषदेने याआधीच नाव बदलाचा ठराव मंजूर केला होता. त्याला आता महसूल विभागाने मान्यता दिली आहे. यानंतर, राज्याच्या राजपत्रात याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

(नक्की वाचा- Fastag Annual Pass: पुणे जिल्ह्यातल्या 'या' टोलनाक्यांवरही सुरु झाला फास्टॅग, वाचा सर्व माहिती)

या निर्णयामुळे स्थानिक लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राजगड किल्ला हा मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेत त्याचे मोठे योगदान आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्याला राजगड असे नाव मिळाल्याने या ऐतिहासिक स्थळाला योग्य तो मान मिळाला आहे. या नामकरणामुळे या भागातील पर्यटन आणि ऐतिहासिक महत्त्व आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारनेही या नामकरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता वेल्हे तालुका अधिकृतपणे राजगड तालुका म्हणून ओळखला जाईल. या निर्णयामुळे प्रशासकीय आणि स्थानिक स्तरावर काही बदल होतील, परंतु याचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना आदरांजली वाहणे हाच आहे.

Advertisement

Topics mentioned in this article