Vangani Ilegal Houses News Today : वांगणीत अनधिकृत चाळींवर अखेर महसूल विभागानं हातोडा टाकला आहे. वांगणी पश्चिमेकडील एकविरा नगर भागात धडक कारवाई करत महसूल विभागानं शंभरहून अधिक घरं जमीनदोस्त केली आहेत.या कारवाईमुळे चाळमाफियांचे धाबे दणाणले आहेत.विशेष म्हणजे या चाळींमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचं वास्तव्य वाढत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. त्यामुळे या कारवाईमुळे गुन्हेगारांनाही चाप बसणार आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या जागेतही केली होती अवैध बांधकामे
वांगणी ग्रामपंचायत हद्दीत चाळ माफियांनी अक्षरश:उच्छाद मांडला होता.वांगणी पश्मिमेकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम करण्यात आलं होतं.सोशल मीडियात स्वस्त घरांच्या फसव्या जाहिराती करत त्याची गोरगरीबांना विक्री केली जात होती. या चाळ माफियांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या जागेतही अवैध बांधकामं केली होती.
नक्की वाचा >> Baramati News: बारामतीत NCP अजित पवार गटाच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा, विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी
तहसीलदार अमित पुरी यांनी धडक कारवाई केली
याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यानंतर वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यानंतर अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी मोठ्या फौज फाट्यासह वांगणीत धडक कारवाई केली.या कारवाईत जवळपास शंभरहून अधिक घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानेही राज्य महामार्गावरील अतिक्रमाणांवर कारवाई केलीय,अशी माहिती अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी दिली आहे.
नक्की वाचा >> Palghar News: वसईच्या 'या' गावात हळहळ! 13 महिन्यांचा चिमुकला स्विमिंगपूलमध्ये बुडाला, रिसॉर्टमध्ये काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world