Rohit Pawar latest Tweet : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे. भाजप युवा मोर्चाने या अपघाताचा थेट संबंध रोहित पवार यांच्या साखर कारखान्याशी जोडला आहे. या साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाला का?असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आलीय. अशातच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून रोहित पवार यांच्या नव्या ट्वीटचीही चर्चा रंगली आहे.
रोहित पवार एक्सवर (Twitter) काय म्हणाले?
रोहित पवारांनी एक्सवर म्हटलंय की, "Mr.प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की,अजितदादांच्या अपघाताला/घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं..तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात,हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा.."