पुण्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर किती वाहनांची विक्री? RTO ची आकडेवारी आली समोर

मात्र मागील वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत घट झाली आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर विविध प्रकारची खरेदी केली जाते. यामध्ये सोने, चांदी, कपडे आणि इतर वस्तूंची विक्री वाढली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

पुण्यातील वाहनांच्या गर्दीत दसऱ्यानिमित्त भर पडली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पुणेकरांना हजारो वाहनांची खरेदी केली आहे. यामध्ये चारचाकी, दुचाकी वाहनांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत पुणेकरांनी कानाडोळा केल्याचं दिसून येत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत वाहनांची ही खरेदी कमी आहे. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी काळात एकूण 10,601 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. ज्यामध्ये 363 इलेक्ट्रिक वाहनं आहेत. 2024 च्या दसऱ्याच्या दिवशी पुण्यात 10,601 वाहनांची नोंदणी झाली, ज्यामध्ये 6707 दुचाकी, 2922 चारचाकी, 346 मालवाहू वाहने, 261 ऑटो-रिक्षा, 20 बस, 231 टॅक्सी आणि 114 इतर प्रकारची वाहने आहेत.

मात्र मागील वर्षाच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत घट झाली आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर विविध प्रकारची खरेदी केली जाते. यामध्ये सोने, चांदी, कपडे आणि इतर वस्तूंची विक्री वाढली आहे. 

मागील वर्षाच्या तुलनेत वाहन नोंदणींचा तुलनात्मक अभ्यासानुसार, चारचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत घट झाली आहे. 2023 मध्ये 6,144 दुचाकी आणि 3482 कारची नोंदणी झाली होती. तर यावर्षी दुचाकींची नोंदणी थोडी वाढली आहे. 

Advertisement

मात्र पण कार खरेदीची संख्या कमी झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीतही लक्षणीय घट झाली आहे. यावर्षी फक्त 363 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. तर 2023 मध्ये 1031 नोंदणी झाल्या होत्या. एकूणच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय घट दिसून येते.

Topics mentioned in this article